26 September 2020

News Flash

मुंबईत पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या

मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप पोखरणकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

| September 1, 2014 05:51 am

गावदेवी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप पोखरणकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सायन येथील प्रतिक्षानगर पोलीस वसाहतीत राहत असलेल्या पोखरणकर यांनी आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळावर दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. पोखरणकर यांच्या खोलीला आतून कडी होती. तसेच खोलीत आत्महत्येपूर्वी लिहिलेले कोणतेही पत्र आढळून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2014 5:51 am

Web Title: mumbai psi comitted suiside
Next Stories
1 आठवड्याभरात भाजपची पहिली यादी जाहीर करू – फडणवीस
2 युती तुटणार?
3 किशोरी उत्कर्ष मंच उपक्रमात शाळांची थट्टा!
Just Now!
X