News Flash

मद्यधुंद अवस्था आणि सेल्फीच्या नादापायी बचावाला उशीर; प्रत्यक्षदर्शींची माहिती

सुरक्षा रक्षकांनी सांगितली माहिती

मद्यधुंद अवस्था आणि सेल्फीच्या नादापायी बचावाला उशीर; प्रत्यक्षदर्शींची माहिती
ट्रेड हाऊसमधील टेरेसवर '१ अबव्ह' आणि त्याच्या बाजूला मोजोस ब्रिस्ट्रो हे रुफ टॉप रेस्तराँ आणि बार आहेत.

वन अबव्ह पबमधील आग्नितांडव सुरु असताना काही लोक सेल्फी घेण्यात मग्न होते. तर इतर काही जण मद्यधुंद अवस्थेत असल्याने बचावाला उशीर झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. या अग्नितांडवामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला असून यात ११ महिलांचा समावेश आहे.

सर्वत्र आग्रीचे साम्राज्य असताना बाहेर पडण्याचा रस्ता शोधण्यात अडचणी येत होत्या, त्यामुळे त्यातील काहीजणांनी बचावासाठी स्वतःला स्वच्छतागृहात कोंडून घेतले. इमारतीच्या वरच्या मजल्यावर पबमध्ये वाढदिवसाची पार्टी सुरु होती. त्यामुळे येथे बरीच गर्दी होती. आग लागल्यानतंर मात्र ही गर्दी वेगाने इमारतीतील विविध भागात पसरली. मध्यरात्री मोठा गोंधळ ऐकू आल्याने मी माझ्या कार्यालयाबाहेर आलो. यावेळी लोकांना लोंढा माझ्याकडे येत असल्याचे मी पाहिले. बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यासाठी त्यांची धडपड सुरु होती, असे खासगी सुरक्षा एजन्सीत काम करणारे या घटनेचे प्रत्यक्षदर्शी महेश साबळे यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

साबळे यांनी सांगितले, त्यांची एजन्सी या इमारतीतील टाइम्स नाऊचे न्यूज चॅनेलच्या कार्यालयाला सुरक्षा पुरवण्याचे काम करते. या कार्यालयाची उपग्रहाशी प्रक्षेपण जोडणाऱी यंत्रणा छतावर बसवण्यात आली आहे, याच्या बाजूलाच वन अबव्ह पब तयार करण्यात आला आहे. या ठिकाणीच आगीला सुरुवात झाली होती.

इमारतीलील आगीत अडकलेल्या लोकांना बाहेर पडण्याचा मार्ग नेमका माहिती नसल्याने त्यातील काही जण लिफ्टने छतावर सुरक्षा एजन्सीच्या कार्यालयाकडे धाव घेत होते. यावेळी सुमारे १५० ते २०० लोकांना मी स्वतः बाहेर पडण्याचा मार्ग सांगत होतो. यांपैकी काही जण हे विश्रांतीगृहात थांबले होते. अनेक जण मदतीसाठी ओरडत होते. काचा फोडून सांगण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, सर्वत्र आगीने वेढल्याने मलाही जखमी लोकांना बाहेर काढण्यसाठी जाता येत नव्हते, अशी माहिती साबळे यांनी दिली.

यावेळी साबळे यांचे सहकारी संजय गिरी हे देखील रात्रपाळीला होते. त्यावेळी त्यांची ड्युटी तळमजल्यावर होती. लोकांना बाहेर काढण्यात ते मदत करीत होते. गिरी यांनी सांगितले की, सुरुवातीला काही मद्यधुंद अवस्थेत असलेले लोक आणि काही आगीसोबस सेल्फी घेण्यात आणि चित्रीकरण करण्यात मग्न असल्याने त्यांना वाचवण्यात उशीर होत होता. यावेळी काही लोक त्यांचे नातेवाईक आणि मित्र आगीत अडकल्याचे वारंवार सांगत होते. त्यांच्यासाठी लोक व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल देखील करीत होते.

दरम्यान, तळमजल्यावर काही एलपीजी सिलेंडर्स ठेवण्यात आले होते. यावेळी जळालेला भाग त्यावर पडत होता. मात्र, अग्निशामक दलाने मोठ्या शर्थीने हे सिेलेंडर्स तेथून हटवले. जर हे सिलेंडर्स फुटले असते तर संपूर्ण इमारत आगीच्या भक्षस्थानी पडली असती, असे गिरी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2017 10:01 pm

Web Title: mumbai pub fire drunken stupor selfie obsession added to delay in evacuation
Next Stories
1 कमला मिल अग्नितांडव: हॉटेल मालकांवर कारवाई होणारच-मुख्यमंत्री
2 Kamala Mill Tragedy : आत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या दोन भावांचा मृत्यू
3 कमला मिलमधील बळी हे महापालिकेच्या गलथानकारभाराचे पाप: राष्ट्रवादी
Just Now!
X