News Flash

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे आज दोन तास बंद

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तास बंद राहणार आहे

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तास बंद राहणार आहे. दुपारी 12 ते 2 दरम्यान एक्स्प्रेस वेवरील वाहतूक बंद राहील. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पनवेलजवळ ओव्हरहेड गँट्रीज बसवण्याचं काम हाती घेण्यात आल्यानं एक्स्प्रेस वे बंद असणार आहे. एक्स्प्रेस वेवर ठिकठिकाणी कमानी उभारण्यात येत आहेत. यामुळे आज वाहनचालक आणि प्रवाशांची काही काळ गैरसोय होणार आहे.

या कमानी उभारताना संपूर्ण रस्ता बंद ठेवावा लागतो. बंदच्या वेळेत पुण्याला जाणारी वाहतूक कळंबोली बायपासमार्गे वळवण्यात येणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे पनवेलजवळ इलेक्ट्रॉनिक फलक लावण्याचे काम सुरू आहे. या कालावधीत वाहनचालकांनी कळंबोली सर्कल, उरण बायपास रोड, टी-पॉइंट, पळस्पे फाटा, कोन, कोन ब्रीज व तेथून एक्सप्रेस-वे वर यावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 10:27 am

Web Title: mumbai pune express way will be closed for two hours 31 january 2019
Next Stories
1 प्रवाशावर हात उगारणाऱ्या रिक्षाचालकाला मनसे कार्यकर्त्यांचा दणका
2 उद्योगासाठी दिलेली सरकारी जमीन इमारतींसाठी खुली
3 करबुडव्यांच्या मालमत्तेचा लिलाव?
Just Now!
X