मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी झालेल्या विचित्र अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर हा विचित्र अपघात झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी भरधाव कार खोपोलीजवळ उलटली. तेव्हा मागून येणारी कार, टेम्पो आणि ट्रक यांचीही टक्कर झाली. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आयआरबीचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना नवी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.