News Flash

मुंबई-पुणे हायपरलूपला पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता

मुंबई—पुणे (वांद्रे-कुर्ला संकुल ते वाकड) दरम्यान ११७.५० किमी अंतरासाठी राबविला जाणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई—पुणे (वांद्रे-कुर्ला संकुल ते वाकड) दरम्यान ११७.५० किमी अंतरासाठी राबविला जाणार आहे. सुमारे ७० हजार कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक यात होणार आहे. या प्रकल्पामध्ये प्रस्तावित गती ४९६ किमी प्रति तास अपेक्षित असून त्यामुळे पुणे ते मुंबई यामधील प्रवासाचा कालावधी फक्त २३ मिनिटांचा होणार आहे.

पहिल्या टप्प्यात जवळपास पाच हजार कोटी खर्च होणार असून या टप्प्यात ११.८० कि.मी. लांबीचा पथदर्शी प्रकल्प म्हणून पुणे महानगर प्रदेशामध्ये बांधकाम करण्यात येणार आहे. पथदर्शी प्रकल्प हा दोन ते अडीच वर्षांत राबविण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. संपूर्ण प्रकल्प ६ ते ७ वर्षांत पूर्ण करण्यात येईल. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित करण्यास व डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेक्नॉलॉजी, आयएनसी यांच्या भागीदारी समूहास मूळ प्रकल्प सूचक म्हणून घोषित करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 1:13 am

Web Title: mumbai pune hyperloop project recognized as infrastructure project abn 97
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांना राज्यातील महिलांकडून २१ लाख राख्या
2 एमबीए प्रवेशासाठी खासगी परीक्षांची जुनी गुणपत्रके?
3 ३२९ प्रकल्पांच्या विकासकांना ‘महारेरा’चा दणका
Just Now!
X