रेल्वेमार्गावरील महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामासाठी रविवारी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

मध्य रेल्वे

  • कुठे – मुलुंड ते माटुंगा या स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर
  • कधी – सकाळी ११.२० ते सायं. ४.२० वा.
  • परिणाम – ब्लॉकदरम्यान अप धिम्या मार्गावरील गाडय़ा अप जलद मार्गावरून चालवल्या जातील. या गाडय़ा त्यांच्या नेहमीच्या थांब्यांशिवाय मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव या स्थानकांवर थांबतील. या गाडय़ा नाहुर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार या स्थानकांवर थांबणार नाहीत.

हार्बर मार्ग

  • कुठे – सीएसटी ते चुनाभट्टी-माहीम यांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
  • कधी – सकाळी ११.१० ते सायं. ४.४० वा.
  • परिणाम – ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील सीएसटीहून सुटणाऱ्या आणि सीएसटीपर्यंत येणाऱ्या सर्व सेवा रद्द राहतील.

मात्र प्रवाशांच्या सेवेसाठी कुल्र्याहून काही सेवा पनवेल-वाशीसाठी चालवल्या जाणार आहेत. ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना अधिकृत तिकीट काढून मुख्य व पश्चिम मार्गाने प्रवास करता येणार आहे.

पश्चिम रेल्वे

  • कुठे – चर्चगेट ते मुंबई सेंट्रल यांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
  • कधी- सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वा.
  • परिणाम – ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील जलद गाडय़ा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल यांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरून चालवल्या जातील. त्यामुळे जलद तसेच धिम्या मार्गावरील काही सेवा रद्द करण्यात येणार आहेत. यामुळे वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने धावणार आहे.