रविवारी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी तीन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.

पश्चिम रेल्वे

कधी : सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत

कुठे: अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

परिणाम :  पश्चिम रेल्वे मार्गावर भाईंदर ते वसई रोड स्थानका दरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येणार  आहे.  अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील वाहतुक भाईंदर ते वसई रोड स्थानका दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावरुन चालविण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

कधी : सकाळी११.२० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत

कुठे:  ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

परिणाम: सकाळी १०.४८ ते दुपारी ४.२३ वाजेपर्यंत मुलुंडहून सुटणारी डाउन धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड ते कल्याण स्थानका दरम्यान डाउन जलद मार्गवरुन चालविण्यात येणार आहे. सीएसटीहून सकाळी १०.२० ते दुपारी२.५४ या वेळेत डाऊन जलद मार्गावरून सुटणारया सर्व लोकल गाड्या आपल्या नियमित थांब्याशिवाय घाटकोपर,विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबा देणार आहेत. तसेच १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत.

हार्बर लाईन

कधी : सकाळी ११.१० ते४.१० वाजेपर्यत

कुठे : हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर

परिणाम: ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी दरम्यान लोकलची वाहतूक सकाळी १०.२०  ते दुपारी ३.४८  वाजेपपर्त बंद असेल. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल मार्गावर विशेष गाडया चालवल्या जाणार आहेत.  प्रवासी  सकाळी दहा ते दुपारी चार ट्रान्स हार्बर मार्गाने प्रवास करू शकतात.