डागडुजी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी मध्यरात्री एक ते रविवारी पहाटे सहापर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. पहाटे सहा वाजल्यानंतर रविवारी दिवसभर उपनगरीय लोकल नियमित वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहेत.

पश्चिम रेल्वे

  • कुठे : मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ
  • कधी: शनिवारी मध्यरात्री १२.३० ते रविवारी पहाटे ४. ३०
  • परिणाम: ब्लॉक काळात चर्चगेटकडे येणाऱ्या आणि चर्चगेटहून सुटणाऱ्या धिम्या लोकल मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून चालवल्या जातील. चर्चगेटहून बोरिवली, विरारच्या दिशेने धावणाऱ्या लोकल फलाट नसल्याने महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड स्थानकांवर थांबणार नाहीत. तर चर्चगेटकडे येणाऱ्या लोकल फलाट नसल्याने माहीम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परळ आणि महालक्ष्मी या स्थानकांवर थांबणार नाहीत.

मध्य मार्ग

  • कुठे: माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर
  • कधी: शनिवारी मध्यरात्री एक ते शनिवारी पहाटे सहा वाजेपर्यंत
  • परिणाम: कुर्ला-कल्याण(५.३९), दादर-कल्याण(६.४८) लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय दादर-मडगाव जनशताब्दी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पुणे इंद्रायणी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स-भुसावळ पॅसेंजर या पहाटे मुंबईहून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाडय़ा धिम्या मार्गावरून चालवण्यात येतील. या बदलामुळे या गाडय़ा किमान २० मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर मार्ग

  • कुठे: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि माहीम
  • कधी: शनिवारी मध्यरात्री १.२० ते पहाटे ६.२०
  • परिणाम: पहाटे ४.३२ ते ६.४६ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वडाळा येथून पनवेल, बेलापूर, वाशीसाठी सुटणाऱ्या तसेच पहाटे ४.०३ ते ५.५९ या वेळेत पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या सर्व लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पहाटे ४.२६ ते ६. ५१ या वेळेत सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.