रेल्वे रुळांची देखभाल-दुरुस्ती, ओव्हरहेड वायर यांसह अन्य काही तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेसह हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. तसेच आजच्याच दिवशी पश्चिम रेल्वेमार्गावरही जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज रेल्वे प्रवास त्रासदायक ठरणार आहे.

मध्य रेल्वे –
कुठे : मुलुंड-माटुंगा अप जलद मार्ग
कधी : सकाळी ११ वाजून १५ मिनिटे ते दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांपर्यंत
परिणाम : कल्याणवरून सीएसएमटीकडे जलद मार्गाने धावणाऱ्या सर्व लोकल दिवा आणि परळ या स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर धावतील.
सकाळी १० वाजून ५ मिनिटे ते दुपारी ३ वाजून २२ मिनिटे यादरम्यान सीएसएमटीवरून सुटणारी डाऊन जलद, सेमी जलद लोकल नियमित थांब्याशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा या स्थानकांवर थांबतील.

पश्चिम रेल्वे
कुठे : बोरीवली आणि गोरेगाव
कधी : सकाळी १० वाजून ३५ मिनिटे ते ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत
परिणाम : ब्लॉक काळात अप आणि डाऊन मार्गिकेवरील धिम्या मार्गावरील लोकल बोरीवली आणि गोरेगाव येथून जलद मार्गावरून धावतील. तसेच या काळात बोरीवली स्थानकाच्या फलाट क्रमांक १, २, ३, ४ वरून एकही लोकल धावणार नाही.

हार्बर रेल्वे

पनवेल ते नेरूळ
सकाळी ११ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत (अप आणि डाऊन मार्गावर)

नेरूळ/ बेलापूर ते खारकोपर
सकाळी ११ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजेपर्यंत (अप आणि डाऊनमार्गावर)
मागाब्लॉकच्या कालावधीत ठाणे ते वाशी/ नेरूळ येथील लोकल वेळापत्रकानुसारच धावणार आहेत.