18 July 2019

News Flash

मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी चार ब्लॉक

पश्चिम रेल्वेवरही जम्बो ब्लॉक

(संग्रहित छायाचित्र)

पश्चिम रेल्वेवरही जम्बो ब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग आणि हार्बरसह रविवारी १७ मार्च रोजी एकूण चार ब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या दिवशी गरज असेल तर लोकल प्रवास करण्याचे आवाहन केले जात आहे. मुलुंड ते माटुंगा दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर नियमित कामांसाठी सकाळी ११.३० पासून चार तासांचा आणि हार्बरवर कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गावर ब्लॉक असणार आहे. याशिवाय कर्जत स्थानकातील कामांत एका झाडाचा अडथळा ठरत असल्याने ते पाडण्याच्या कामासाठीही तीन तासांचा, आसनगाव ते कसारा स्थानकादरम्यानही पुलावर गर्डर बसवण्यासाठीही दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर लोकल गाडय़ा उशिराने धावतील. हार्बरवर कुर्ला ते वाशी आणि पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगावदरम्यानही ब्लॉक असेल.

मध्य रेल्वे मुख्य मार्ग

  • मुलुंड ते माटुंगा डाऊन धिम्या मार्गावर ओव्हरहेड वायर, सिग्नल यासह अन्य तांत्रिक कामांसाठी ब्लॉक घेण्यात येईल. सकाळी ११.३० पासून असणाऱ्या ब्लॉकमुळे या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. विद्याविहार, कांजुरमार्ग आणि नाहूर स्थानकातील डाऊन धिम्या मार्गावरील फलाटात लोकल थांबणार नाहीत.
  • कर्जत स्थानकातील फलाट क्रमांक एकवर असणारे एक झाड पाडण्यात येणार आहे. हे काम सकाळी १०.४० ते दुपारी १.४० पर्यंत केले जाईल. त्यामुळे ठाणे स्थानकातून कर्जतसाठी सुटणाऱ्या सकाळी १०.४८ आणि दुपारी १२.०५ वाजताची लोकल, कर्जत ते ठाणे दु.१.२७ आणि कर्जत ते सीएसएमटी १.५७ वाजताची लोकल रद्द केली आहे.
  • आसनगाव ते कसारा अप व डाऊन मार्गावर गर्डर कामासाठी सकाळी १०.५० ते दुपारी १२.५० पर्यंत विशेष ट्रॅफिक ब्लॉक. या दोन स्थानकादरम्यानच्या लोकल सेवा रद्द. मुंबई ते भुसावळ ते मुंबई एक्सप्रेस आणि एलटीटी ते मनमाड ते एलटीटी गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

हार्बर मार्ग

  • कुर्ला ते वाशी अप व डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या कामानिमित्त सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यान अप व डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल ते वाशी आणि कुर्ला ते सीएसएमटी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे

  • बोरिवली ते गोरेगाव दरम्यान दोन्ही धिम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत जम्बो ब्लॉक असणार आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल बोरिवली ते गोरेगाव दरम्यान जलद मार्गावर धावतील.

First Published on March 16, 2019 1:05 am

Web Title: mumbai railway mega block 57