मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण डाऊन धिमा आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर येत्या रविवारी विविध कामांनिमित्त ब्लॉक घेण्यात येईल, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री ११ पासून वांद्रे ते माहीम दरम्यान अप-डाऊन धिमा मार्ग आणि वसई रोड ते वैतरणा दरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी मात्र पश्चिम रेल्वेवर ब्लॉक नसेल. माहीम ते वांद्रे दरम्यान पुलावर गर्डर बसवण्याचे काम केले जाणार असून त्यानिमित्ताने ब्लॉक असणार असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने सांगितले.

मध्य रेल्वे-मुख्य मार्ग

  • कुठे : ठाणे ते कल्याण डाऊन धिमा मार्ग
  • कधी : रविवार, ३१ मार्च. स.१०.३० ते सायं. ४
  • परिणाम : ब्लॉकमुळे मुलुंड ते कल्याण दरम्यान डाऊन धिम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. लोकल गाडय़ांना ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकात थांबा दिला जाईल. मध्य रेल्वे मुख्य मार्गावरील लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर मार्ग

  • कुठे : सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर
  • कधी : रविवार, ३१ मार्च. अप मार्ग- स.११.१० ते दु.३.४० वा आणि डाऊन मार्ग- स.११.४० ते दु. ४.१० वा
  • परिणाम : सीएसएमटी, वडाळा ते वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यान दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द राहतील. पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल फेऱ्या प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.

पश्चिम रेल्वे

  • कुठे : वांद्रे ते माहीम दरम्यान अप-डाऊन धिमा मार्ग आणि वसई रोड ते वैतरणा दरम्यान अप व डाऊन जलद मार्ग
  • कधी : शनिवार, ३० मार्च. वसई रोड ते वैतरणा अप जलद मार्ग-रा. ११.५० ते म.रा. २.५० वा आणि डाऊन जलद मार्ग- म.रा. १.३० ते प.४.३० वा
  • माहिम व वांद्रे दोन्ही धिमा मार्ग- रा.११.०० ते प.६.००
  • परिणाम : वसई रोड ते वैतरणा दरम्यान अप व डाऊन मेल-एक्स्प्रेस, मेमू व डेमू गाडय़ा उशिराने धावतील.