11 August 2020

News Flash

नालेसफाईसाठी प.रे.वर चार दिवसांचा ब्लॉक

सफाई करण्यासाठी चार दिवसांचा अभियांत्रिकी कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे.

संग्रहीत छायाचित्र.

रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक
मुंबई-पश्चिम रेल्वेवरील दादर-एलफिन्स्टन रोड-लोअर परेल या स्थानकांदरम्यान असलेल्या नाल्यांची सफाई करण्यासाठी चार दिवसांचा अभियांत्रिकी कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. १३ ते १६ मेदरम्यान या स्थानकांमधले नाले साफ करण्यात येणार आहेत. अप धिम्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार असून परिणामी या मार्गावरील वाहतूक अप जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहे, तर १५ मे रोजी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामांसाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. १३ ते १६ मेदरम्यान दुपारी १.०५ ते ४.२५ या वेळेत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान दुपारी १ वाजता सुटणारी ९११२४३ आणि ९११७४ बोरिवली आणि ९११८२ विरार ट्रेन या गाडय़ा दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. तसेच माटुंगा रोड, एलफिन्स्टन रोड, लोअर परेल आणि महालक्ष्मी स्थानकांवर या लोकलला थांबा देण्यात येणार नाही. ब्लॉकदरम्यान अप दिशेच्या लोकल गाडय़ा मिनिटे उशिराने धावणार आहेत.

मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक
कुठे – कल्याण ते ठाणे अप फास्ट मार्गावर
कधी – स. ११.३० ते दु. ३.३० वा.
परिणाम – मेगा ब्लॉकच्या काळात कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद सेवा सकाळी ११.२२ ते ३.०५ या वेळेदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. ठाण्याच्या पुढे छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत ही सेवा पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. या वेळी लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा स्थानकांवर थांबतील तसेच या काळात या लोकल गाडय़ा वेळापत्रकापेक्षा वीस मिनिटे उशिराने धावतील. डाऊन फास्ट मार्गावरील लोकल सेवा सकाळी १०.०८ ते दुपारी २.४२ दरम्यान छत्रपती शिवाजी टर्मिनसहून निघाल्यावर वेळापत्रकातील अन्य स्थानकांच्या बरोबरीने घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबतील. तसेच या गाडय़ा १५ मिनिटे उशिराने धावतील.
पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंतच
ट्रेन क्रमांक ५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही रविवारी दादपर्यंत चालवण्यात येणार नसून दिव्यापर्यंतच चालवण्यात येणार आहे. तसेच ही ट्रेन सुटतानाही दिव्यावरूनच सुटेल.

कुठे – छत्रपती शिवाजी टर्मिनस ते चुनाभट्टी / माहिम अप आणि डाऊन हार्बर मार्गावर
कधी – स. ११.१० ते दु. ३.४० वा.
परिणाम – ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी टर्मिनसहून वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ११.०४ ते दुपारी ३.५३ दरम्यान बंद राहतील आणि अप हार्बर मार्गावरून वाशी/बेलापूर/पनवेल येथून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे सुटणाऱ्या सेवा सकाळी ९.५२ ते दुपारी २.३२ वाजेपर्यंत बंद राहतील. तसेच, छत्रपती शिवाजी टर्मिनसहून वांद्रे/अंधेरी येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ११.०४ ते दुपारी ३.४९ दरम्यान बंद राहतील आणि अप हार्बर मार्गावरून वांद्रे/अंधेरी येथून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे सुटणाऱ्या सेवा सकाळी १०.४४ ते दुपारी ३.१६ वाजेपर्यंत बंद राहतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2016 3:26 am

Web Title: mumbai railway mega block 6
टॅग Mega Block
Next Stories
1 ‘नीट’ तोडग्यासाठी आरोग्यमंत्र्यांची बैठक
2 प्रज्ञासिंह आरोपमुक्त
3 भुजबळांचा जामीन फेटाळला
Just Now!
X