विविध तांत्रिक कामांसाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मध्य तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील उपनगरी रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील.

मध्य रेल्वे

कुठे – कल्याण ते ठाणे अप जलद मार्ग

कधी – स. ११.२० ते दु. ३.५०

परिणाम – कल्याणहून सकाळी १०.५४ ते दुपारी ३.५२ या काळात सुटणाऱ्या उपनगरी रेल्वे कल्याण ते ठाणे दरम्यान अप धिम्या मार्गावर चालवण्यात येतील व ठाण्यापर्यंत सर्व मागांवर थांबतील. ठाणे ते सीएसएमटी दरम्यान जलद रेल्वे नेहमीच्या थांब्याव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा या स्थानकांत थांबतील. सीएसएमटी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.२२ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद गाडय़ा नेहमीच्या थांब्याव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकात थांबतील. या काळात डाऊन व अप जलद गाडय़ा २० मिनिटे उशिराने, तर सकाळी ११ ते ५.०० दरम्यानच्या सर्व धिम्या रेल्वे १५ मिनिटे उशिराने धावतील. मुंबईकडे येणाऱ्या अप मेल/ एक्स्प्रेस २० ते ३० मिनिटे विलंबाने धावतील.

 

हार्बर रेल्वे

कुठे – कु र्ला ते वाशी अप व डाऊन

कधी – सकाळी ११ ते दुपारी ३. ४०

परिणाम – सकाळी १०.३४ ते दुपारी ३.०८ या वेळेत सीएसएमटीहून पनवेलकडे जाणारी तर सकाळी १०.३४ ते दुपारी ३.०८ या वेळेत पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीकडे येणारी सर्व उपनगरी रेल्वे सेवा बंद असेल. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते पनवेल मार्गावर विशेष फे ऱ्या चालवल्या जातील. ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करण्याची मुभा राहील.

 

पश्चिम रेल्वे

कुठे – बोरिवली ते भाईंदर अप आणि डाऊन जलद मार्ग

कधी – स.११.०० ते दुपारी ३.००

परिणाम – या काळात बोरिवली ते वसई/विरार दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन जलद लोकल गाडय़ा या धिम्या मार्गावर चालवण्यात येतील. जम्बो ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन लोकल गाडय़ा रद्द केल्या जातील.

अंधेरी स्थानकात ब्लॉक

फूट ओव्हरब्रिजच्या गर्डरच्या कामासाठी अंधेरी येथे २५ ऑगस्ट रात्री ते २६ ऑगस्ट सकाळी चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पाचव्या आणि अप जलद मार्गावर रात्री १.०५ ते ५.०५ पर्यंत अंधेरी स्थानकात हा ब्लॉक घेण्यात येईल. त्याचबरोबर पाचव्या मार्गावर आणि अप आणि डाऊन जलद, तसेच अप धिम्या मार्गावर १.०५ ते ३.३५ दरम्यान अंधेरी स्थानकात ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकच्या काळात सकाळच्या मेल/एक्स्प्रेस गाडय़ा गोरेगाव ते सांताक्रूझ दरम्यान अप धिम्या मार्गावरून चालविण्यात येतील. गोरखपूर-वांद्रे टर्मिनस अवध एक्स्प्रेस आणि जामनगर-वांद्रे टर्मिनस सौराष्ट्र जनता एक्स्प्रेस या गाडय़ांना अंधेरी येथे पाच क्रमांकाच्या फलाटावर दोन वेळा थांबा देण्यात येणार आहे. गोरेगाव व  सांताक्रूझ स्थानकादरम्यानच्या काही अप जलद गाडय़ा धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. १२ उपनगरी रेल्वे रद्द केल्या जातील.