ऐन गर्दीच्यावेळी कल्याण-ठाणे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याने त्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. कळवा येथील लेव्हल क्राॅसिंग गेट जास्त वेळ सुरु ठेवल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याचे सुत्रांकडून कळते. मात्र, यावर मध्य रेल्वेकडून अद्याप कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

लेव्हल क्राॅसिंग गेटमुळे कल्याण-ठाणे धीम्या मार्गावरील रेल्वे गाड्या ठप्प झाल्या आहेत. कालही याच कारणामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली होती. कळवा येथील हा लेव्हल क्रॉसिंग गेटचा मुद्दा गेल्या दहा वर्षांपासून रखडलेला आहे. त्यामुळे नाहक प्रवाशांना वारंवार त्रासाला सामोरे जावे लागत आहे.