News Flash

रविवारी पश्चिम रेल्वेवर जम्बो, तर मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेवरील ट्रान्स हार्बर मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : येत्या रविवारी, १५ डिसेंबर रोजी पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्याचबरोबर मध्य रेल्वेवरील ट्रान्स हार्बर मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल, मध्य रेल्वेवरील कल्याण ते दिवा आणि ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी या दरम्यान दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्ग

* कुठे : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप, डाऊन जलद मार्ग

* कधी :  स. १०.३५ ते दु. ३.३५

* परिणाम : या दरम्यान जलद मार्गावरील जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाडय़ा धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. काही गाडय़ा रद्द करण्यात येतील.

मध्य रेल्वे मार्ग

* कुठे : कल्याण ते दिवा अप जलद मार्ग

* कधी : स. ११.२५ ते दु. ३.५५ पर्यंत

* परिणाम : ब्लॉक काळात कल्याण ते ठाणे दरम्यान जलद मार्गावरील सेवा धिम्या मार्गावरून सोडण्यात येणार आहे. या गाडय़ा सर्व स्थानकांवर थांबतील. त्यानंतर ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान जलद मार्गावरून धावतील.

ट्रान्स हार्बर मार्ग

* कुठे : पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्ग

* कधी : स. ११.३० ते दु. ४.०० पर्यंत

परिणाम : अप हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पनवेलला सकाळी ११.०६ ते दुपारी ४.०१ या काळात आणि डाऊन मार्गावरून पनवेल, बेलापूरहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ या काळात सोडण्यात येणाऱ्या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वाशी दरम्यान विशेष लोकल गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. तसेच ठाणे-पनवेलदरम्यान सकाळी १०.१२ ते दुपारी ३.५३ काळात धावणाऱ्या, तसेच ठाणे-पनवेलदरम्यान सकाळी ११.१४ ते दुपारी ३.२० काळात धावणाऱ्या गाडय़ाही रद्द करण्यात आल्या आहेत.

वांद्रे टर्मिनस-जबलपूरदरम्यान विशेष गाडय़ांच्या फेऱ्या : प्रवाशांची मागणी लक्षात घेत पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस ते जबलपूरदरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष ट्रेन २८ मार्च २०२० पर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी या विशेष ट्रेनच्या फेऱ्या २८ डिसेंबपर्यंत विस्तारित करण्यात आल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 2:51 am

Web Title: mumbai railways to conduct mega block on central harbour and jumbo on western line zws 70
Next Stories
1 आमदारांच्या नाराजीच्या भीतीने मंत्रिमंडळ विस्तारही टप्प्याटप्प्याने?
2 जिल्हा परिषदांसाठी शिवसेनेशी आघाडीची तयारी
3 ठाण्यातील १८ प्रकल्पांसाठी वृक्ष हटवण्यास दिलेली परवानगी योग्य की अयोग्य?
Just Now!
X