20 October 2020

News Flash

Mumbai Rain : दोन रेल्वे गाड्यांमध्ये अडकलेल्या सुमारे १५०० प्रवाशांना NDRFने सुरक्षित बाहेर काढले

मुंबईकडे येणारी शताब्दी एक्स्प्रेस आणि वडोदरा एक्स्प्रेसमधील हे प्रवासी आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF), पोलीस आणि अग्निशामक दलाने संयुक्तरित्या ही बचाव मोहिम राबवली.

दोन रेल्वे गाड्यांमध्ये अडकलेल्या सुमारे २००० प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा आणि वसई स्टेशनदरम्यान अडकलेल्या लांब पल्याच्या दोन रेल्वे गाड्यांमधील सुमारे १५०० प्रवाशांना सुरक्षितरित्या वाचवण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF), पोलीस आणि अग्निशामक दलाने संयुक्तरित्या ही बचाव मोहिम राबवली. मुंबईकडे येणारी शताब्दी एक्स्प्रेस आणि वडोदरा एक्स्प्रेसमधील हे प्रवासी आहेत.


वडोदरा जंक्शनमधून काल रात्री सुटलेल्या वडोदरा एक्स्प्रेसला आज सकाळी पावणे पाच वाजता मुंबई सेंट्रल स्टेशनला पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, रेल्वेचे रुळच पाण्याखाली गेल्याने ही गाडी अडकून पडली होती. पालघरचे उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जारे यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे तसेच सकाळी समुद्राला आलेल्या उधाणामुळे नालासोपारा आणि वसई स्टेशनदरम्यान पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा अधिक वाढली. त्यामुळे ४३ कर्मचारी आणि ६ बोटींसह एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. वडोदरा एक्स्प्रेसमध्ये काही प्रवाशी सकाळी चार वाजल्यापासून अडकून पडले होते.

पालघर जिल्ह्यात काल सकाळपासून आज सकाळ पर्यंत चोवीस तासात सुमारे २४० मीमी पाऊस झाला. राज्य परिवहनच्या ३० पेक्षा अधिक एसटी गाड्यांना रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आणण्यासाठी पाठवण्यात आले होते. मात्र, वसई आणि परिसरातील साचलेल्या पाण्यामुळे या बसही अडकून पडल्या होत्या.


रेल्वे गाड्यांमधून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलेल्या प्रवाशांना वसई स्टेशनला आणण्यात येत आहे. या स्टेशनवरुन त्यांना लोकल गाड्या आणि विशेष बसेसमधून त्यांच्या निश्चित ठिकाणी पोहोचवण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये अडकलेल्या ४०० पेक्षा अधिक लोकांना देखील सुरक्षित जागी हलवण्यात आले आहे. त्याचबरोबर वसई मिठानगर येथील ९७ स्थानिक लोकांना आणि ५ लहान मुलांना एनडीआरएफने वाचवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2018 11:17 pm

Web Title: mumbai rain around 2000 passengers stranded in two trains were taken out safely
Next Stories
1 पावसाळ्यात ‘लाईफलाईन’ का कोलमडते? मुंबई हायकोर्टाचा सवाल
2 पावसातून वाट काढताना भाजपा प्रवक्त्यांचे बूट हातात
3 पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा; इंद्रायणी, डेक्कन एक्स्प्रेस रद्द
Just Now!
X