मागच्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्याच्या अन्य भागात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे काही दुर्घटना घडल्या आहेत. पावसाळयात दरवर्षी झाड कोसळण्याच्या दुर्घटना घडतात. दक्षिण मुंबईत रविवारी संध्याकाळी मेट्रो सिनेमाजवळ पिंपळाच्या झाडाची फांदी अंगावर पडून दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आणि तिघेजण जखमी झाले. पी.व्ही बास्टीयन (७५) आणि राजेंद्र कुमार (६०) अशी मृतांची नावे आहेत.

– नवी मुंबईत एका नदीमध्ये बुडून तीन जणांचा मृत्यू झाला. एकाचा मृतदेह सापडला असून दोन मृतदेहांचा अजूनही शोध सुरु आहे.

– ठाण्याच्या पोखरण रोड भागात संरक्षक भिंत कोसळली पण सुदैवाने कोणीतीही जिवीतहानी झाली नाही. दोन गाडया आणि एका बाईकचं नुकसान झालं.

नवी मुंबई तळोजा येथे बुडालेल्या तीन तरुणांना शोधण्यासाठी शोध मोहिम सुरु आहे.