News Flash

Mumbai Rain: दादरमध्ये भिंत कोसळली; गोरेगावमध्ये शॉक लागून दोघांचा मृत्यू

पहिल्याच पावसात मुंबईत अनेक ठिकाणी दुर्घटना झाल्या आहेत

(छाया - निर्मल हरिंद्रन)

मुंबईकरांना गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतिक्षा लागलेल्या पावसाने अखेर हजेरी लावली आहे. पण पहिल्याच मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची मात्र चांगलीच त्रेधा उडाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं असून, रस्ते आणि रेल्वे दोन्हीकडची वाहतूक अगदी धीम्या गतीने सुरु आहे. दरम्यान दादरमधील फुल मार्केटमध्ये भिंत कोसळून तीनजण जखमी झाले आहेत. त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे वीजेचा धक्का लागल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अंधेरी आणि गोरेगावमध्ये ही दुर्घटना घडली आहे.

तसंच भिवंडी – ठाणे रोडवरील राहनाळ येथे होली मेरी शाळेच्या समोरील उघड्या गटारात पावसाचे पाणी साचल्याने विद्यार्थिनी आणि तिची आई पडली. सुदैवाने नागरिकांनी दोघींनाही बाहेर काढल्याने अनर्थ टळला.

जोरदार पावसामुळे मंदावला मुंबईचा वेग

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, या ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतल्या पश्चिम उपनगरांमध्येही पावसाने चांगलीच हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा मुंबईकरांना होती. तो पाऊस अखेर बरसण्यास सुरूवात झाल्याने मुंबईकरांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे. ठाणे जिल्ह्यातही सगळीकडेच पावसाने हजेरी लावली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील अंधेरी, पवई या ठिकाणी जोरदार पाऊस पडू लागला आहे. जून महिन्याच्या सुरूवातीलाच पाऊस सुरू होतो. मात्र घामाच्या धारांनी मुंबईकर जूनच्या अखेरपर्यंत हैराण झाले होते. त्या सगळ्याच मुंबईकरांना अखेर पावसाने दिलासा दिला आहे.

 

[bc_video video_id=”6053371200001″ account_id=”5798671096001″ player_id=”default” embed=”in-page” padding_top=”56%” autoplay=”” min_width=”0px” max_width=”640px” width=”100%” height=”100%”]

मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण या ठिकाणीही पावसाची हजेरी आहे. नवी मुंबईतल्या अनेक भागांमध्ये पाऊस सुरू झाला आहे. वायू वादळ आल्याने मान्सून चांगलाच लांबला. कुठेही पाऊस नव्हता आता मात्र पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईतल्या मालाड, गोरेगाव, अंधेरी या भागांमध्येही पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे अखेर मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर, कोकण, औरंगाबाद या ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या होत्या. मात्र मुंबईत पावसाने हजेरी लावली नव्हती. गुरूवारी नाशिक, पुणे, कल्याण डोंबिवली परिसरातही पाऊस झाला. आता मात्र मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 4:44 pm

Web Title: mumbai rain update dadar wall collpase andheri goreagaon rain sgy 87
Next Stories
1 #MumbaiRains: खऱ्याखुऱ्या पावसानंतर पडला ‘मिम्सचा पाऊस’, पाहा व्हायरल मिम्स
2 VIDEO: तुंबलेले रस्ते, स्टेशनवरील ‘धबधबे’; पहिल्याच पावसात मान्सूनपूर्व तयारी गेली वाहून
3 जोरदार पावसामुळे मंदावला मुंबईचा वेग
Just Now!
X