Mumbai Rain Update: मध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. नवी मुंबई, ठाणे, दादर, सायन, कुर्ला, माटुंगा, अंधेरी, हिंदमाता आणि लालबागमध्ये मध्यरात्रीपासून संततधार सुरूच आहे.  सायन-माटुंगा या रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे दादर ते कुर्ला दरम्यानची वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे. मुसळधार पावसामुळे दादरच्या हिंदमाता आणि सायन परिसरात पाणीच पाणी झालं असून वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे

सांताक्रूझमध्ये ५८ मिमी, तर कुलाबामध्ये १७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रात्रीपासून मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पोषक स्थितीमुळे सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. पुढील चार दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार आहे. २४ आणि २५ जुलैला कोकण विभागातील मुंबईसह इतर काही ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही पुढील चार दिवसांत पावसाची शक्यता आहे.

कोकण परिसरामध्ये सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्याचप्रमाणे कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक स्थिती आहे. त्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोकण विभागासह राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी आहे. पुढील चार ते पाच दिवस पाऊस पडणार आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये कोकणात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कोकण विभागात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. २४ आणि २५ जुलैला कोकण विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Live Blog

08:39 (IST)24 Jul 2019
कुर्ला हायवेवर चेंबूरजवळ पाणी साचले

कुर्ला हायवेवर चेंबूरजवळ पाणी साचले

08:30 (IST)24 Jul 2019
हार्बर रेल्वे १० मिनिटं उशीरानं

रात्रभर पडलेल्या पावसामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक १० मिनिटं उशीरानं सुरू आहे. 

08:29 (IST)24 Jul 2019
किंग सर्कल परिसरात सखल भागात साचले पाणी

किंग सर्कल परिसरात सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतूकीचा बोजवारा उडाला आहे. रस्त्यावर साचलेल्या  पाण्यामध्ये दोन ट्रक, एक एसटी आणि रिक्शा अडकल्या आहेत. 

08:26 (IST)24 Jul 2019
मध्य रेल्वे १५ मिनिटं उशीरानं

सायन येथे रूळावर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे.  मध्य रेल्वे सध्या १५ मिनिटं उशीरानं धावत आहे. 

08:26 (IST)24 Jul 2019
मध्य रेल्वे १५ मिनिटं उशीरानं

सायन येथे रूळावर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे.  मध्य रेल्वे सध्या १५ मिनिटं उशीरानं धावत आहे. 

08:25 (IST)24 Jul 2019
उपनगरीय वाहतूक सेवेवर परिणाम

मंगळवारी रात्री ११ वाजल्यापासून मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार सुरू आहे. रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वे , आणि बेस्ट वाहतूकीवर परिणाम झाला आहे.