News Flash

VIDEO: तुंबलेले रस्ते, स्टेशनवरील ‘धबधबे’; पहिल्याच पावसात मान्सूनपूर्व तयारी गेली वाहून

पहिल्या पावसाचा आनंदही आणि चिंताही

व्हायरल व्हिडिओ

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, या ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतल्या पश्चिम उपनगरांमध्येही जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा मुंबईकरांना होती तो पाऊस अखेर बरसण्यास सुरूवात झाल्याने मुंबईकरांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र सालाबादप्रमाणे यंदाही पहिल्याच पावसात प्रशासनाने केलेल्या दाव्यांची पोलखोल झाल्याचे चित्र पाऊस सुरु झाल्यानंतर अवघ्या तासाभरात दिसू लागले आहे. काही ठिकाणी पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांनी प्रशासनाने केलेल्या दाव्यांची पोलखोल करणारे व्हिडिओ ट्विटवरुन शेअर केले आहेत. यामध्ये ठाणे स्टेशवरील छप्परामधून गळणारे पाणी, तुंबलेला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, उशीरा धावणाऱ्या लोकल ट्रेन अशा अनेक गोष्टींचे व्हिडिओ ट्विपल्सने पोस्ट केले आहेत. तर दुसरीकडे अनेकांनी उशीरा का होईना पाऊस आला याबद्दल आनंद व्यक्त करताना अगदी कांदा भजीपासून पावसापर्यंतचे अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. #MumbaiRains हा हॅशटॅग ट्विटवर ट्रेण्ड होताना दिसला. पाहुयात हेच व्हायरल झालेले व्हिडिओ

वेस्टर्न एक्सप्रेस हायवे

चाळीतला पाऊस

जुहू

रस्ते की नदी?

पाऊस आणि लाँग ड्राइव्ह

ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्म एकवरील धबधबा

पवई

अंधेरी

मुंबई आणि पावसाळा

पाऊस आणि वाहतूक कोंडी

पाऊस

ठाणे

मुंबईचा पाऊस

आला पाऊस

लॅण्डस्केप

स्लो मोशन

ढगच ढग

सुरुवात

अंधेरी

पावसाच्या सरी

किंग्स सर्कल

भजी खायची वेळ झाली

दरम्यान, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जुलैच्या सुरुवातीलाही मुंबईसहीत राज्यभरामध्ये जोरदार ते मध्य स्वरुपाचा पाऊस पडणरा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 12:24 pm

Web Title: mumbai rains viral videos on twitter scsg 91
Next Stories
1 नागपूर विद्यापीठात तीन जण प्यायले दीड लाखांची चहा काॅफी आणि …
2 आधी ट्रोल नंतर स्टार ! व्हायरल झालेला हा ‘संतापलेला’ चाहता आठवतोय ना?
3 Video : ‘पाकिस्तानला विश्वचषकाबाहेर करण्यासाठी भारत मुद्दाम पराभूत होणार’
Just Now!
X