News Flash

“मुंबई अनलॉकसाठी सज्ज, पण…”; आयुक्त इक्बालसिंग चहेल यांची महत्त्वाची माहिती

रेल्वे सेवेबाबतही दिली माहिती

गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. असं असलं तरी मुंबईसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे मुंबईतील करोनाचा वेग हा मंदावताना दिसत आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईत दररोज १ हजार ७०० पेक्षा अधिक करोनाबाधितांची नोंद झालेली नाही. त्यामुळे मुंबई अनलॉक करता येऊ शकते, असं मत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी व्यक्त केलं.

“गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईतील करोनाबाधितांची संख्या ही दररोज १ हजार ७०० पेक्षा अधिक नाही. त्यामुळे मुंबई अनलॉक करता येऊ शकते. परंतु मुंबई महानगर क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे,” असं चहेल म्हणाले. मुंबईतील रुग्णवाढीचा दर हा १ टक्का इतका आहे. परंतु मुंबई महानगर क्षेत्रात (मुंबई बाहेर) करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ज्यावेळी मुंबई महानगरक्षेत्रात करोनावाढीचा दर खाली येऊन मुंबई इतका होईल तेव्हा प्रवासी वाहतूक सुरळीत करण्याचा विचार होऊ शकतो असंही त्यांनी स्पश्ट केलं. तसंच सध्या मुंबईत रुग्ण दुपटीचा वेग हा ६४ दिवस असल्याचंही चहेल म्हणाले. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. सध्या मुंबईत केवळ अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. मे महिन्यात मुंबईत करोनाबाधितांचा दर ६.७ टक्के इतका होता. परंतु आता तो १ टक्क्यावर आला आहे.

“जर २० दशलक्ष लोकसंख्या असलेल्या शहराला जर दररोज २०० पेक्षा कमी रुग्णालयातील बेड्सची गरज भासत असेल तर स्थितीत पहिल्यापेक्षा खुप चांगली आहे. एमएमआर क्षेत्राची लोकसंख्या २ कोटी आहे. जर एकदा रेल्वे सेवा सुरू झाली तर मोठ्या प्रमाणात लोकं येण्यास सुरूवात होईल. तर कल्याण आणि नालासोपारा या ठिकाणांपर्यंत रेल्वेसेवा सुरू होईल. एमएमआर एका सुरक्षित टप्प्यात आल्यानंतर मी स्वत: यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस करेन,” असंही चहेल यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 2:44 pm

Web Title: mumbai ready to be unlocked but must let mmr stabilise bmc commissioner iqbalsingh chahal jud 87
Next Stories
1 मुंबईत करोनामुळे सहा हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू
2 मराठी किशोर वाङ्मयात ‘नव्या’ नायकांचा दुष्काळ
3 अभ्यासक्रमाला कात्री!
Just Now!
X