गेल्या २४ तासांमध्ये वरुणराजा मुंबई आणि महाराष्ट्रावर चांगलाच प्रसन्न झालेला आहे. मुंबई, मुंबई उपनगरं, ठाणे, कोकण किनारपट्टीतल्या भागात अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. गेल्या २४ तासात मुंबईत २३१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामातला हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईच्या या पावसाने चेरापुंजीचा विक्रमही मोडीत काढला आहे. चेरापुंजी हे भारतातलं सर्वात जास्त पर्जन्यमान असलेलं शहर आहे. रविवारी चेरापुंजीत २२८ मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र मुंबईने गेल्या २४ तासात हा विक्रम मोडीत काढला आहे.

गेल्या २४ तासात देशभरात सर्वाधिक पाऊस पडलेली १० शहरं पुढीलप्रमाणे – (पाऊस मिमी मध्ये)

सांताक्रुझ (मुंबई) – २३१

डहाणू – २२६

कुलाबा (मुंबई) – ९९

चेरापूंजी – २२८

दार्जिलींग – ८२

शिराली (कर्नाटक) – ७५

पारादीप (ओडीशा) – ६०

वलसाड (गुजरात) – ५५

हर्णे (महाराष्ट्र) – ५४

गंगटोक (सिक्कीम) – ५०

(वरील माहिती स्कायमेट या संकेतस्थळावरुन घेतलेली आहे)