मुंबईत एकाबाजूला करोना रुग्णांची संख्या दररोज वाढतेय तर दुसऱ्या बाजूला करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. जून महिन्यातल्या पहिल्या नऊ दिवसात करोनामुळे दररोज सरासरी ५३ मृत्यू झाले आहेत. हेच मे महिन्यात शेवटचे नऊ दिवस करोनामुळे दररोज सरासरी ४१ मृत्यू झाले होते.

मे महिन्यातील शेवटच्या नऊ दिवसांच्या तुलनेत जूनमध्ये मृत्यूचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे. जून महिन्यात मुंबईत करोनामुळे आतापर्यंत ४८१ मृत्यू झाले आहेत. एक जून रोजी ४० त्यानंतर पुढचे तीन दिवस ४९ मृत्यू झाले. पाच जूनला ५४ सहा जूनला ५८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. मंगळवारी करोनामुळे ५८ जणांचा मृत्यू झाला.

रविवारी ६१ आणि सोमवारी ६४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. मे महिन्यात करोनामुळे दररोज सरासरी ३२ मृत्यू झाले. मुंबई दररोज सरासरी १३०० करोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत आहे.

आणखी वाचा- मुंबईत हॉस्पिटलमधून पळालेल्या करोना पेशंटचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू

महाराष्ट्रात मागच्या २४ तासात २२५९ नवे करोना रुग्ण
महाराष्ट्रात २२५९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या ९० हजार ७८७ झाली आहे. आत्तापर्यंत ४२ हजार ६३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ४४ हजार८४९ रुग्ण सध्याच्या घडीला अॅक्टिव्ह आहेत. मागील २४ तासांमध्ये १२० मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आत्तापर्यंत करोनाची बाधा होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या ३ हजार २८९ झाली आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.