24 January 2021

News Flash

मुंबईत दिवसभरात १ हजार १४४ नवे करोनाबाधित, १७ रुग्णांचा मृत्यू

करोनाबाधितांची एकूण संख्या आता २ लाख ७८ हजार ५९० वर

(संग्रहित छायाचित्र)

राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा एकदा वाढत असल्याचे दिसत आहे. आज दिवसभरात मुंबईत १ हजार १४४ नवे करोनाबाधित आढळले. तर, १७ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील करोनाबाधितांची एकूण संख्या आता २ लाख ७८ हजार ५९० वर पोहचली आहे. ज्यामध्ये आजपर्यंत डिस्चार्ज मिळालेले २ लाख ५३ हजार ६०४ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १० हजार ७२३ जणांच्या संख्येचा समावेश आहे. मुंबईतील अॅक्टिव्ह केससची संख्या ११ हजार १०१ आहे. आज दिवसभरात मुंबईत ७०१ जण करोनातून बरे झाले.

आज राज्यात ६ हजार १५९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या १७ लाख ९५ हजार ९५९ इतकी झाली आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये ६५ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातली करोना रुग्णांची आजची संख्या टेन्शन वाढवणारी

मागील चोवीस तासांमध्ये राज्यात ४ हजार ८४४ रुग्ण करोना मुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण १६ लाख ६३ हजार ७२३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.६४ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४ लाख ५६ हजार ९६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ९५ हजार ९५९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख २९ हजार ३४४ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ६ हजार ९८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ८४ हजार ४६४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

Corona: केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाइन्स जाहीर, ३१ डिसेंबरपर्यंत नियम लागू

महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. महाराष्ट्रातल्या सीमांवर तपासणी करण्यात येते आहे. दिल्ली, गुजरात, गोवा आणि राजस्थान या चार राज्यातून येणाऱ्यांचीही चाचणी होते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2020 9:18 pm

Web Title: mumbai reports 1144 new covid19 cases and 17 deaths today msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 “समुद्राचं खारं पाणी गोडं करण्याचा महाग प्रकल्प मुंबईकरांना परवडणार आहे का?”
2 इलेक्ट्रीक करंट अंगातून गेल्याप्रमाणे नाचणारे भाजपा नेते…; सचिन सावंत यांनी साधला निशाणा
3 मुंबईतील सर्वात धोकादायक मार्गांमध्ये ‘बाळासाहेब ठाकरे फ्लायओव्हर’चा समावेश
Just Now!
X