News Flash

मुंबईत करोनाचे १४४२ नवे रुग्ण, ४८ मृत्यू, संख्या ४४ हजारांच्या पुढे

आत्तापर्यंत १८ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबईत करोनाचे १४४२ नवे रुग्ण गेल्या चोवीस तासांमध्ये आढळले आहेत. तर ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला मुंबईत करोनाचे ४४ हजार ७०४ रुग्ण आहेत. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत १८ हजार ९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मुंबईत २५ हजार १४१ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आत्तापर्यंत मुंबईत १४६५ रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे.

आज झालेल्या ४८ मृत्यूंपैकी ३३ पुरुष तर १५ महिला होत्या. आज नोंदवण्यात आलेल्या ४८ मृत्यूंपैकी ७ मृत्यू ४० वर्षांखालील रुग्णांचे होते. तर २३ मृत्यू ६० वर्षे वयावरच्या रुग्णांचे होते. १८ रुग्ण हे ४० ते ५९ वयाचे होते. अशीही माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ७७ हजारांच्याही पुढे

मागील २४ तासांमध्ये २९३३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या ७७ हजार ७९३ इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.२९ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यू दर ३.४८ टक्के राज्यात १२३ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यापैकी ८५ पुरुष तर ३८ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२३ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे ७१ रुग्ण होते. तर ४४ रुग्ण हे वय ४० ते ५९ वर्षे वयोगटातील होते. ८ रुग्णांचे वय ४० वर्षांखालील होते. १२३ पैकी ९२ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे गंभीर आजार होते. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २७१० झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 10:12 pm

Web Title: mumbai reports 1442 new covid19 positive cases and 48 deaths scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सलाम मुंबई पोलीस! खाकीतल्या देवदूताने रक्तदान करुन वाचवले लहान मुलीचे प्राण
2 नालेसफाईवरील कोट्यवधींचा खर्च जातो कुठे?; राम कदमांचा मुंबई महापालिकेला सवाल
3 सफाई कर्मचारी बनले लिपीक; वसई-विरार महापालिकेतील मोठा घोटाळा उघड
Just Now!
X