मुंबई : मुंबईत रविवारी ७९४ नव्या रुग्णांची नोंद झाली तर २० रुग्णांचा मृत्यू झाला. तर एका दिवसात ८३३ रुग्ण करोनामुक्त झाले. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.१३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी ५२७ दिवसांपर्यंत वाढला आहे. गेल्या आठवडय़ाभरापासून मुंबईतील दैनंदिन रुग्णांची संख्या हजाराखाली स्थिरावली आहे.

रविवारी ७९४  नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ७ लाख ११ हजारापुढे गेली आहे. एका दिवसात ८३३ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत ६ लाख ७८ हजाराहून अधिक  म्हणजेच ९५ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.  त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली आहे. सध्या १६ हजार ७० उपचाराधीन रुग्ण आहेत.

शनिवारी २६ हजार ७५८ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी चार टक्क्यांपेक्षा कमी नागरिक बाधित आढळले आहेत. आतापर्यंत ६४ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.  रुग्णवाढीचा दर  ०.१३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही ५२७ दिवसांवर पोहोचला आहे. रविवारी २०  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

ठाणे जिल्ह्यात ५५८ बाधित

ठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवारी ५५८ रुग्ण आढळले. तर ३३ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील ५५८ करोना रुग्णांपैकी कल्याण—डोंबिवली १४६, ठाणे १२४, नवी मुंबई ८१, ठाणे ग्रामीण ७४, मिरा- भाईंदर ६५, अंबरनाथ २१, बदलापूर २०, उल्हासनगर १६ आणि भिवंडीत ११ रुग्ण आढळून आले. तर ३३ मृतांपैकी कल्याण—डोंबिवली २२, नवी मुंबई चार, मिरा- भाईंदर तीन, ठाणे एक, उल्हासनगर एक, अंबरनाथ एक आणि भिवंडीत एकाचा मृत्यू झाला.