राज्यातील करोना संसर्गाच वेग आता काहीसा वाढत असल्याचं दिसत आहे. मुंबईत आज दिवसभरात ८०० नवे करोनाबाधित आढळले. तर, १४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची मुंबईतील एकूण संख्या २ लाख ७६ हजार ५०७ वर पोहचली आहे.

आज दिवसभरात मुंबईत ३७२ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण २ लाख ५२ हजार ४९९ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. तर, सध्या मुंबईत १० हजार १४१ अॅक्टिव्ह केसेस आहेत.

महाराष्ट्रात मागील चोवीस तासात ४ हजार १५३ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. १ कोटी २ लाख ८१ हजार ५४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी एकूण १७ लाख ८४ हजार ३६१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर मागील चोवीस तासांमध्ये ३० रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मागील चोवीस तासात ३ हजार ७२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण १६ लाख ५४ हजार ७९३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (रिकव्हरी रेट)९२.७४ टक्के इतका झाला आहे.

दरम्यान करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चार राज्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी करोना चाचणी सक्तीची केली आहे. दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यात करोना रुग्णांची संख्या वाढतेय. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या चार राज्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी करोना चाचणी सक्तीची केली आहे.