News Flash

Coronavirus – मुंबईत मागील २४ तासांत ९ हजार ९० नवीन करोनाबाधित, २७ रूग्णांचा मृत्यू

दिवसभरात ५ हजार ३२२ रूग्ण करोनातून बरे झाले

संग्रहीत

राज्यातील करोना संसर्ग आता अधिकच झपाट्याने वाढत आहे. मुंबई व पुण्यात तर दररोज आढळणाऱ्या रूग्ण संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शिवाय रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही भर पडतच आहे. मुंबईत मागील २४ तासांमध्ये ९ हजार ९० नवीन करनाबाधित रूग्ण वाढले असून, २७ रूग्णांचा मृत्यू झाला पाहिजे.

याचबरोबर याच कालावधीत मुंबईत ५ हजार ३२२ रूग्ण करोनातून बरे देखील झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत मुंबईत करोनातून ३ लाख ६६ हजार ३६५ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

सध्या मुंबईतील अॅक्टिव्ह रूग्ण संख्या ६२ हजैर १८७ आहे. तर, आजपर्यंत ११ हजार ७५१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे.

दरम्यान, मुंबईत करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णांमध्ये लक्षणे नसलेल्या बाधितांची (एसिम्प्टोमॅटिक) व सौम्य लक्षणे असलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यांना बहुतांशी घरी विलगीकरण करून औषधोपचार दिले जातात. गृहविलगीकरणात असलेल्या बाधितांची संख्या मोठी असल्यामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांसह वैद्यकीय मंडळी आणि रुग्णशय्यांचे व्यवस्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नियंत्रण कक्ष यांच्यासाठी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने के लेल्या विविध सूचना समाविष्ट असलेले सुधारित परिपत्रक कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्या स्वाक्षरीनिशी निर्गमित केले आहे.

तसेच, ७५ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या, तसेच शारिरीक व्यंग असलेल्या, अंथरूणाला खिळलेल्या नागरिकांचे घरी जाऊन लसीकरण करण्याचे आदेश केंद्र व राज्य सरकार तसेच पालिकेला द्यावेत, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबईतील  दोन वकिलांनी उच्च न्यायालयात केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 7:39 pm

Web Title: mumbai reports 9090 fresh covid cases and 27 deaths in the last 24 hours msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Antilia Bomb Scare Case : सचिन वाझेंच्या NIA कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ!
2 मीरा-भाईंदर: स्वयंघोषित धर्मगुरूचा १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार
3 “सचिन वाझे जेलमध्ये असल्याने उद्धव ठाकरेंनी माझ्याकडून १०० कोटी वसूल करायला सांगितलं”
Just Now!
X