अतिदक्षता विभागात उपचार सुरू

मुंबई : ताडदेव पोलीस स्थानकाबाहेरील खड्डय़ामुळे स्कूटरवरून पडून जखमी झालेल्या आदिती काडगे (३०) यांच्या डोक्याला मार लागला असून अजूनही त्या अर्धवट शुद्धीमध्ये आहेत. बुधवारी झालेल्या या अपघातानंतर भाटिया रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

gadchiroli naxalite marathi news
दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग
Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
mahayuti, mumbai, mahayuti mumbai lok sabha marathi news
मुंबईतील तीन मतदारसंघांतील तिढ्याने उमेदवारांचा शोध सुरू
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा

ताडदेव येथील फॉरजेट रस्ता येथे राहणाऱ्या आदिती या बुधवारी ताडदेव पोलीस स्थानकाकडे स्कूटरवरून जात होत्या. पोलीस स्थानकाजवळील मोठय़ा खड्डय़ामध्ये तोल जाऊन त्या खाली पडल्या. अपघातानंतर ताडदेव पोलिसांनी त्यांना तात्काळ नायर रुग्णालयामध्ये दाखल केले. पुढील उपचारांसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना लगेचच भाटिया रुग्णालयामध्ये नेले.

‘मी माझ्या मुलासोबत माझ्या मोटारसायकलवरून जात होतो. तर आदिती तिच्या स्कूटरवरून निघाली. पोलीस वसाहतीतून आत शिरताच काही अंतरावर असलेल्या खड्डय़ात गाडी आपटून आदिती खाली पडली. ताडदेव पोलिसांच्या मदतीने आम्ही तिला नायर रुग्णालयात आणले. तेथून तिला भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले,’ असे आदिती यांचे पती नीलेश काडगे यांनी सांगितले.

आदिती यांच्या डोक्याच्या डाव्या भागामध्ये गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या भागामध्ये अस्थिभंग झाला असून मेंदूमध्ये देखील काही भागांमध्ये रक्तस्राव झाला आहे. अपघातामध्ये डोक्याच्या उजव्या बाजूला, डोळ्याजवळ आणि उजव्या हाताच्या कोपरालाही मार लागला आहे. सध्या त्या अर्धवट शुद्धीमध्ये असून बोलण्याला काही प्रमाणात प्रतिसाद देत आहेत. दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा त्यांची सीटी स्कॅन तपासणी केली जाईल, असे भाटिया रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजीव बोधनकर यांनी सांगितले.