03 June 2020

News Flash

‘मुंबई श्री’च्या मंचावर अवतरणार पीळदार सौंदर्य; ‘मिस मुंबई’साठी चुरशीची लढत

लोक काय म्हणतील? हा विचार बाजूला सारून उतरणार स्पर्धेत

मिस मुंबई स्पर्धेत सहभागी होणाऱ्या (डावीकडून) डॉ. मंजिरी भावसार, डॉ. माया राठोड, रेणुका मुदलियार

स्त्री म्हटली की केवळ चूल आणि मूल असं समीकरण पूर्वी होतं. पण काळ बदलला आणि स्त्री देखील पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून सगळी कामे करू लागली. आजही काही ठिकाणी लग्न, कुटुंब आणि मुल-बाळ यांच्यात व्यापात स्त्री ला स्वत:च्या करिअरकडे, आवडी-निवडींकडे मनापासून लक्ष देता येत नाही. पण आपल्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडून केवळ स्वत:च्या पॅशनसाठी ‘स्पार्टन मुंबई श्री’च्या मंचावर पीळदार सौंदर्य अवतरणार आहे. २९ फेब्रुवारी रोजी अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लॅक्सच्या सेलिब्रेशन स्पोर्टस् क्लबमध्ये जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धेत महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळणार आहे.

सध्या महिलांमध्येही फिटनेस आणि शरीरसौष्ठवाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. मिस मुंबई जेतेपदासाठी फिटनेस फिजीक आणि शरीरसौष्ठव या दोन गटांत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये या स्पर्धेबाबत प्रचंड उत्सुकता आहे. भारतीय शरीरसौष्ठवात सर्वाधिक मानाची आणि प्रतिष्ठेची असलेली स्पार्टन मुंबई श्री स्पर्धा.. या स्पर्धेत महिलांच्या गटाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. फिटनेस फिजीक आणि शरीरसौष्ठव या दोन्ही गटात पाचपेक्षा अधिक खेळाडूंची नोंद झाल्यामुळे स्पर्धा अधिक रंगतदार होणार हे निर्विवाद सत्य आहे. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटनेने या स्पर्धेसाठी जोरदार तयारी केली आहे.

<—  गतविजेत्या डॉ. मंजिरी भावसार

या स्पर्धांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा आणि फिटनेसबाबत जागरूकता निर्माण व्हावी, म्हणून वर्षभर घेतलेल्या परिश्रमाचे चीज ‘स्पार्टन मुंबई श्री’ मध्ये होणार असल्याची भावना संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी बोलून दाखवली आहे. अनेक महिला आपल्या पीळदार सौष्ठवाचं प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून स्पर्धेच्या दिवशी थेट स्पर्धेला येणाऱ्या खेळाडूंचा आकडा महिला फिटनेस क्षेत्राला स्फूर्ती देणारा असेल, असा विश्वास सरचिटणीस राजेश सावंत यांनी व्यक्त केला आहे.

दोन वर्षांपूर्वी महिलांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे मिस मुंबई ही स्पर्धा रद्द करावी लागली होती. पण यावेळी मात्र स्पर्धा दणक्यात पार पडणार आहे. गतविजेती मंजिरी भावसार, दिपाली ओगले, रेणूका मुदलियार, निशरीन पारिख, डोलान आचार्य असे पीळदार सौंदर्य फिटनेस फिजीक प्रकारात असणार आहे. तर शरीरसौष्ठव स्पर्धेत अमला ब्रम्हचारी, श्रद्धा डोके, माया राठोड अशा खेळाडू असणार आहेत.

या स्पर्धेत उतरणाऱ्या बहुतांश खेळाडू या केवळ आपल्या पॅशनसाठी खेळणार आहेत. “निव्वळ पॅशनसाठी शरीरसौष्ठव स्पर्धेत उतरत असले, तरी मी माझी कोणतीही जबाबदारी झटकलेली नाही. पण पहिल्याएवढं दडपण माझ्यावर नसेल. एखाद्या स्त्रीने मनात आणलं तर ती काहीही साध्य करू शकते, हेच मला दाखवून द्यायचंय”, असा विश्वास शरीरसौष्ठवपटू डॉ. माया राठोड यांनी व्यक्त केला आहे. गायनाकालॉजिस्ट असलेल्या माया एक यशस्वी डॉक्टर असूनसुद्धा निव्वळ पॅशनसाठी ‘मिस मुंबई’ स्पर्धेत खेळणार आहेत. होमियोपॅथी डॉक्टर गतविजेत्या मंजिरी भावसार, प्रख्यात विमान कंपनीत हवाई सुंदरी असलेल्या रेणूका मुदलियार यांसारखे खेळाडू या स्पर्धेत असणार आहेत.

लोक काय म्हणतील? हा विचार बाजूसा सारून साऱ्या जणी स्पर्धेत उतरणार आहेत. “जेव्हा एखाद्या खेळाडूला चाहत्यांकडून मनापासून दाद मिळते, तोच आमच्यासाठी सर्वोच्च पुरस्कार असतो. त्या पुरस्कारासाठी आम्ही साऱ्या आसुसलेल्या आहोत”, अशी विनम्र भावना मिस मुंबईत सहभागी होणाऱ्या महिला खेळाडूंनी व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2020 1:55 pm

Web Title: mumbai shree bodybuilding competition beautiful female contestants to take part in miss mumbai trophy vjb 91
Next Stories
1 विराटला विनाकारणं मोठं केलंय ! लंकन पत्रकाराची कोहलीवर टीका
2 “सचिनसारखा कोणीच नाही…”; पाकिस्तानी माजी कर्णधाराने उधळली स्तुतिसुमनं
3 “आता डोनाल्ड ट्रम्प ‘फखर झमान’चं नाव कसं घेतात बघायचंय”
Just Now!
X