News Flash

मुंबईत Spy Network वर क्राईम ब्रँचचा छापा, लष्कराची गोपनिय माहिती मिळवण्याच्या प्रयत्न करणारा अटकेत

चालू अवस्थेतली चायनिज सिमकार्ड, लॅपटॉप, अँटीना असं साहित्य जप्त

मुंबईतील चेंबूर भागात बसून टेलिफोन आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय लष्कराची जम्म-काश्मीरमधली माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या Spy Network वर छापेमारी करण्यात आली आहे. लष्कराचं एक पथक आणि मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने केलेल्या कारवाईत एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जागेवरुन भारतीय लष्कराची जम्मू काश्मीरमधील माहिती व सैन्यदलाच्या हालचालींविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता. Voice over Internet Protocol या तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता.

या छापेमारीदरम्यान पोलिस आणि लष्कराच्या पथकाने बऱ्याच महत्वाच्या गोष्टी जप्त केल्या आहेत. ३ कार्यरत असलेली चायनिज सिमकार्ड, याव्यतिरीक्त १९१ सिमकार्ड, लॅपटॉप, मॉडम, अँटीना, बॅटरी आणि कनेक्टर असा माल पथकाच्या हाती लागला आहे. चायनिज सिमकार्ड आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आवाज बदलून Voip तंत्रज्ञानाचा वापर करुन भारतीय लष्कराची माहिती मिळण्याचा प्रयत्न सुरु होता अशी माहिती IANS वृत्तसंस्थेने दिली आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासात पाकिस्तानवरुन आलेले कॉल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्थानिक नंबरवर डायव्हर्ट करुन भारतीय लष्कराची गोपनिय माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता. त्यामुळे मुंबई पोलीस या प्रकारात पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI चा सहभाग आहे का याचा तपास करत आहेत. भारत आणि चीन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सीमेवर तणाव सुरु आहे. काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्येही सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करण्याचा मोठा कट उधळून लावण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या या कारवाईला महत्व प्राप्त झालेलं आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून पोलीस अशा प्रकारची Spy Network आणखी किती ठिकाणी तयार करण्यात आली आहेत याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 6:07 pm

Web Title: mumbai spy network using illegal voip exchange to report indian armys movement in jammu kashmir busted one arrested psd 91
Next Stories
1 करोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांच्या मानधनात भेदभाव!
2 करोना रुग्णांना होमिओपॅथी व आयुर्वेदिक औषधोपचारासाठी आता शासन मान्यतेची मोहर!
3 वर्षभरापासून देशाची अर्थव्यवस्था संकटात-संजय राऊत
Just Now!
X