देशभरात आजपासून काही रेल्वे धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईच्या पाच रेल्वे स्थानकांवर टॅक्सी सेवा सुरु करण्याचा निर्णय परिवहन आयुक्तालयाने घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस आणि दादर या स्थानकांवर टॅक्सी उपलब्ध असेल. पण, प्रवाशांना रेल्वे स्टेशन आणि घर यादरम्यान प्रवासासाठीच ही टॅक्सी सेवा उपलब्ध असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून टॅक्सी आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या प्रवाशांना टॅक्सी आरक्षित करायची आहे, त्यांना फोन किंवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून नोंदणी करता येईल. रेल्वे स्थानकावरच मुंबई टॅक्सीमेन्स संघटनेच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅक्सीसेवेसाठी प्रतिनिधींचा संपर्क क्रमांक :-
1. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल आणि दादर – चंद्रशेखर नायर : 9821640498
2. लोकमान्य टिळक टर्मिनस – शशी दुबे : 9833080800
3. वांद्रे टर्मिनस : रवी देवडिगा : 9029885938