News Flash

मुंबई : कारच्या ब्रेकऐवजी दाबलं अॅक्सिलेटर, तरुणीने ५ जणांना उडवलं

पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर तरुणीने स्वतःची चूक असल्याचं मान्य केलं

एका १९ वर्षीय तरुणीच्या चुकीमुळे मुंबईच्या रस्त्यावर मोठा अपघात झाला. या तरुणीने गाडीवर ताबा मिळवण्यासाठी ब्रेक दाबण्याऐवजी चक्क अॅक्सिलेटर दाबलं आणि पाच जणांना जोरदार धडक दिली. सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झाली नसली तरी ५ जण जखमी झाले, जखमींमध्ये एका चिमुकल्याचाही समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी धारावीजवळ हा अपघात झाला. ध्रुवी जैन असं या तरुणीचं नाव असून ती वकिलीच्या पहिल्या वर्षाचं शिक्षण घेत आहे. ती आणि तिच्या ३ मैत्रिणी वांद्रे येथे जात असताना हा अपघात झाला. संबंधित तरुणीने कार भाड्यावर घेतली होती. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर तरुणीने स्वतःची चूक असल्याचं मान्य केलं. गाडीवर ताबा मिळवण्यासाठी ब्रेक दाबण्याऐवजी मी चुकून अॅक्सिलेटरवर पाय ठेवला. त्यामुळे माझा गाडीवरील ताबा सुटला आणि पादचाऱ्यांना धडक बसली असं तिने पोलिसांसमोर कबुल केलं. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक करुन तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तरुणी दारुच्या नशेत असण्याची शक्यता वर्तवली जात होती, त्यामुळे तिची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. वैद्यकिय तपासणीमध्ये काहीही निष्पन्न न झाल्याने तरुणीला बुधवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 3:51 pm

Web Title: mumbai teen hits accelerator instead of break
Next Stories
1 लिफ्टमध्ये महिलेला नको तिथे स्पर्श करुन विनयभंग, बोरीवलीतील टॉवरमधील घटना
2 मुंबईत वृद्ध दाम्पत्याची गळा दाबून हत्या ?
3 मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजच्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या कट ऑफमध्ये तीन टक्क्यांची वाढ
Just Now!
X