मुंबई : शहरातील करोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस घटत असून रुग्ण दुपटीचा कालावधीही १४५ दिवसांवर घसरला आहे. महिन्याभरापूर्वी हा कालावधी ३५ दिवस इतका होता. शहरात शनिवारी २,६७८ रुग्ण आढळले, तर ६२ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्यावाढीचा दरही गेल्या आठवड्यापासून घटू लागला आहे.

ठाणे जिल्ह्यात १,९६६ बाधित

जिल्ह्यात शनिवारी १,९६६ नवे रुग्ण आढळले, तर ६८ जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक मृत्यू कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात झाले. २४ तासांतील बाधितांमध्ये कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ५३३, ठाणे ४७९, ठाणे ग्रामीण २४१, नवी मुंबई २३९, मीरा-भाईंदर २२५, बदलापूर ९७, अंबरनाथ ७०, उल्हासनगर ७० आणि भिवंडीतील १२ रुग्णांचा समावेश आहे.