मुंबईमधील करोना वाढीचा दर सरासरी ०.४२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण एक टक्क्याने घसरून ९२ टक्के झाले आहे. मुंबईत सोमवारी १,७१२ जणांना करोनाची बाधा झाली असून चार रुग्णांचा मृत्यू झाला.

आतापर्यंत मुंबईतील करोनाबाधितांची संख्या तीन लाख ४५ हजार ६५९ वर पोहोचली आहे, तर ११ हजार ५३५ मुंबईकरांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले १,०६३ रुग्ण सोमवारी करोनामुक्त झाले. आतापर्यंत तब्बल तीन लाख १८ हजार ६४२ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. असे असले तरी सोमवारी रुग्ण करोनामुक्त होण्याच्या प्रमाणात एक टक्क््याने घट झाली असून हे प्रमाण ९२ टक्के झाले आहे. त्याचबरोबर मुंबईतील करोना दुपटीचा काळ सरासरी १६५ दिवसांपर्यंत खाली आला आहे. आजघडीला १४ हजार ५८२ रुग्ण उपचाराधीन आहेत.  करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. सोमवारी दिवसभरात १५ हजार ६९७ चाचण्या करण्यात आल्या.