30 November 2020

News Flash

धक्कादायक! मुंबईत दोन अल्पवयीन मुलांनी केला तीन वर्षाच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

अवघ्या तीन वर्षाच्या एका चिमुकलीवर दोन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना

मुंबईमध्ये एका चिमुकलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुंबईच्या कस्तूरबा मार्ग पोलीस स्थानकात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अवघ्या तीन वर्षांच्या एका चिमुकलीवर दोन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबतचं वृत्त दिलंय. याप्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आल्याची माहिती कस्तुरबा मार्ग पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली आहे. दरम्यान, या धक्कादायक घटनेबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 11:22 am

Web Title: mumbai three year old girl allegedly gang raped by two minor boys sas 89
Next Stories
1 शिवसेनेत सगळेच विद्वान एकापेक्षा एक ; महापौरांच्या वक्तव्यावरून भाजपा नेत्याचा टोला
2 विनामुखपट्टी फिरणारे ‘तोंडघशी’
3 विक्रेते, फेरीवाल्यांच्या चाचण्या सुरू
Just Now!
X