स्वप्ननगरी मुंबईचे दर्शन करण्यासाठी देशभरातून आणि विदेशातून पर्यटक भेट देतात. आता मुंबईचे दर्शन पर्यटकांना एकाच ठिकाणाहून करता येणार आहे. तब्बल 285 फुटांवरुन पर्यटकांना मुंबई पाहता येणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेकडून प्रेक्षक गॅलरी उभारण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. मलबार हिलमधल्या हॅगिंग गार्डनशेजारी ११ कोटी रूपयांचा खर्च करून मुंबई महापालिका प्रेक्षक गॅलरी उभारली जाणार आहे. परदेशात जसा अनुभव घेता येतो तसाच अनुभव या गॅलरीतून आपल्याला मिळणार आहे. प्रेक्षक गॅलरीत दुर्बीण आणि टेलिस्कोपही बसवले जाणार आहेत.

या प्रेक्षक गॅलरीतून नरीमन पॉईंटचा क्वीन्स नेकलेस, निळाशार समुद्र, गिरगाव चौपाटी आणि मुंबईचं इतर वैभव पाहता येणार आहे. या प्रेक्षक गॅलरीचे काम जवळपास पूर्ण झालं असून लवकरच याचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. शिवसेनेच्या पाठपुराव्यातून होणाऱ्या या मुंबईच्या प्रेक्षक गॅलरीला दिवंगत शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांचं नाव देण्यात येणार आहे.

Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड
easy trip planners limited, company share, stock market, share market, portfolio, share market portfolio, stock market portfolio, easemytrip, trip planning company, holiday planning company, holiday packages, trip planning service, airline ticket service, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रवास सोपा नाही म्हणून!
bullcart race sculpture created in bhosari
भोसरीत बैलगाडा शर्यतीच्या शिल्पाची उभारणी
nature-loving rickshaw driver put Plants in rickshaw
“किती सुंदर दादा!”, निसर्गप्रेमी रिक्षचालकाचा हटके जुगाड पाहून प्रवासी झाले खुश, व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच

या प्रेक्षक गॅलरीमध्ये एकाच वेळी 50 प्रेक्षक मुंबई दर्शनचा अनुभव घेऊ शकतात. सुरक्षेसाठी खास काचेचे तावदान बसवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पर्यटकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.