News Flash

‘सुसाटस्वारां’वर कारवाई

मुंबईतील सात ठिकाणी रस्त्यांवर रात्री ११ ते १ या वेळेत कार शर्यती करणाऱ्या आणि ‘धूम’ स्टाइल बाइक उडविणाऱ्या ‘सुसाटस्वारां’वर वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली

| September 20, 2013 02:52 am

मुंबईतील सात ठिकाणी रस्त्यांवर रात्री ११ ते १ या वेळेत कार शर्यती करणाऱ्या आणि ‘धूम’ स्टाइल बाइक उडविणाऱ्या ‘सुसाटस्वारां’वर वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. शर्यतीमध्ये कोण जिंकणार, यावर जुगार आणि अगदी गाडी बक्षीस देण्यापर्यंत या बाइकस्वारांची मजल गेली आहे. गेल्या आठ महिन्यांत वाहन चालकांविरुद्ध साडेचार लाख गुन्हे व तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत़  त्यांच्याकडून तब्बल चार कोटी रुपये दंडवसुली केली असल्याची माहिती गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी
दिली.
पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, मरिन ड्राइव्ह, ओशिवरा बॅक रोड, वरळी सीफेस, बँडस्टँड, कार्टर रस्ता अशा सात ठिकाणी वाहतूक पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. तेथे रात्री उशीरा कारच्या शर्यती होतात. वेगमर्यादा ओलांडून गाडय़ा चालविणारे बेदरकार वाहनचालक, मद्यपान करून गाडय़ा चालणिारे, सिग्नल तोडणारे वाहनचालक या सर्वाविरुद्ध वाहतूक पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. विशेषत: दुचाकीस्वारांवर मोठय़ा प्रमाणावर कारवाई केली असून मोबाइल चोरी, सोनसाखळी चोरणे आदी गुन्ह्य़ांसाठी मोटरसायकली वापरल्या जात आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांचे लक्ष अधिक आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
याआधी बेदरकार वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध केवळ मोटरवाहन कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई होत असे. आता भारतीय दंडविधानातील कलम २७९ नुसारही कारवाई
केली जात असून त्यानुसार दोन वर्षे तुरुंगवासाचीही शिक्षा आहे.
मद्य पिऊन गाडी चालविणाऱ्या १०१६७ वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यामध्ये ६५८४ बाइकस्वार असल्याची माहिती उपायुक्त प्रताप दिघावकर यांनी दिली.

कारवाईची आकडेवारी
*  बेदरकार वाहन चालविणे- १३१३ प्रकरणे किंवा तक्रारी, एक लाख ८५ हजार रुपये दंड़
*  अतिवेग – २७४ गुन्हे, ४२६०० रुपये दंड़
*  सिग्नल तोडणे- ६२१९४ प्रकरणे, ५३ लाख हजार ४०० हजार रुपये दंड़
*  लेन तोडणे, झिगझ्ॉग वाहन चालविणे- ५२०९ प्रकरणे, ३,९२ हजार रुपये दंड़
*  नो पार्किंग- १,२६,०५७ प्रकरणे, एक कोटी १९ लाख ७५ हजार ७०० रुपये दंड़
*  झेब्रा क्रॉसिंग- १३,४२६ प्रकरणे, ११ लाख ३९ हजार ६०० रुपये दंड़
*  नंबर प्लेट नसणे- १५०७९ प्रकरणे, १२ लाख ४० हजार ८०० रुपये दंड़
*  हेल्मेट नसणे-१,७९,९८७ प्रकरणे, १ कोटी ४२ लाख ९९ हजार ६०० रुपये दंड़
*  स्टंट किंवा धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे- ३३२८ प्रकरणे-२,२६,९०० रुपये
*  परवाना न बाळगणे- ४२४३ प्रकरणे, ३,८५,१०० रुपये दंड़
*  विनापरवाना- १४१९ प्रकरणे, ३,१३,८०० रुपये दंड़
* मद्य पिऊन गाडी चालविणे-१०१६७ प्रकरण़े

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 2:52 am

Web Title: mumbai traffic police collect 4 crore in 8 month from rash driver
Next Stories
1 आरोपींचा साक्षीदार म्हणून पोलीस उपायुक्ताची साक्ष
2 सुशीलकुमार शिंदेंना ‘सीबीआय’चे निर्दोष प्रमाणपत्र
3 पुढच्या वर्षी लवकर या.!