30 September 2020

News Flash

टीव्ही अभिनेत्यावर महिला ज्योतिषाचा बलात्काराचा आरोप, एफआयआर दाखल

आरोपीने बलात्काराचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केलं आणि पैसे उकळले असंही पीडितेने तक्रारीत म्हटलंय

मुंबईत एका महिला ज्योतिषाने एका टीव्ही अभिनेत्यावर लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. मुंबईच्या ओशिवारा पोलीस स्थानकात आरोपी अभिनेत्याविरोधात महिलेने तक्रार दाखल केली आहे. आरोपीने बलात्काराचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केलं आणि पैसे उकळले असं पीडित महिलेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करुन चौकशी सुरू केली आहे. मुंबई मिररने याबाबतचं वृत्त आहे.

ओशिवारा पोलीस स्थानकातील एफआयआरनुसार, ऑक्टोबर 2016 मध्ये एका डेटिंग अॅप्लिकेशनद्वारे दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांची मैत्री झाली. पीडितेने सांगितल्यानुसार, एक दिवस आरोपीने भेटण्यासाठी त्याच्या फ्लॅटमध्ये बोलावलं. येथे आरोपीने लग्नाचं वचनही दिलं. यादरम्यान आरोपीने नारळ पाणी दिलं होतं, ते पाणी प्यायल्यानंतर थोड्याच वेळात तिला चक्कर आली. त्यानंतर आरोपीने बलात्कार केला आणि घटनेचा व्हिडिओही बनवला असा आरोप पीडित महिलेने केला आहे. त्या व्हिडीओद्वारे आरोपी सातत्याने ब्लॅकमेल करत होता आणि पैसे उकळत होता आणि लग्नाबाबत विचारणा केल्यास केवळ टाळाटाळ करत होता. काही दिवसांपूर्वी मी लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने धमकी देऊन जे करायचं असेल ते कर असं म्हटलं. यानंतरच एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचं पीडितेने सांगितलं.

पीडितेच्या तक्रारीनुसार एफआयआर दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास सुरू केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2019 9:45 am

Web Title: mumbai tv actor cum singer booked for raping astrologer
Next Stories
1 चटई क्षेत्रफळाच्या भिन्न व्याख्यांमुळे वाद
2 ‘जलयुक्त शिवार’ची कामे होऊनही २५ हजार गावे दुष्काळग्रस्त
3 अकरावी-बारावीच्या अभ्यासक्रमात ‘संगीतोपचारा’चा समावेश
Just Now!
X