टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या दोन अभिनेत्रींना मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत चोरी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ‘क्राईम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ यासारख्या गुन्हेविषयक मालिकांमध्ये दोघींनी छोट्या भूमिका केल्या आहेत असे पोलिसांनी सांगितले. आरे कॉलनीत पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या या दोन अभिनेत्रींना राहत्या घरातून ३.२८ लाख रुपये चोरल्याप्रकरणी अटक केली आहे. आणखी एका पेईंग गेस्ट राहणाऱ्या व्यक्तीच्या पैशांची या महिलांनी चोरी केली आहे,

मालिकांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे दोघींना पैशांची अडचण निर्माण झाली होती. आरे कॉलनीतील रॉयल पाम या उच्चभ्रू इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात १८ मे रोजी त्या पेईंग गेस्ट म्हणून गेल्या. त्यानंतर त्यांनी त्या घरामध्ये आधीपासून पेईंग गेस्ट म्हणून राहत असलेल्या व्यक्तीच्या तिजोरीतून ३ लाख २८ हजार रुपये घेऊन त्या अभिनेत्रींनी पळ काढला.

muramba fame shivani mundhekar and nishani borule meet indian captain rohit sharma
भारतीय कर्णधार रोहित शर्माला भेटल्या ‘मुरांबा’ फेम रमा अन् रेवा, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंबरोबरचे फोटो व्हायरल
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी
Dharavi slum tour
धारावीला ‘झोपडपट्टी टूर’ म्हणत नाव ठेवणाऱ्या परदेशी इन्फ्ल्युएन्सरवर संतापले नेटकरी, म्हणाले, “ही मस्करी करतेय का?”
dombivli marathi news, company employee beaten up marathi news
डोंबिवली : कंपनी मालकाने साथीदारांसह केली कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

त्यानंतर त्या व्यक्तीने दोघींनी आपले पैसे चोरल्याचा संशय तक्रारदाराने पोलिसांकडे व्यक्त केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर दोघीही इमारतीतून बाहेर पळून जाताना दिसल्या. त्यानंतर पोलिसांनी दोघींना अटक केली आहे. दोघांकडून ५० हजार रुपये पोलिसांनी जप्त केले. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज दाखवल्यानंतर त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. करोना काळात मालिकांचं शूटिंग बंद असल्यामुळे आपल्याला पैशांची पैशांची अडचण निर्माण झाल्याने हे कृत्य केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी त्यांच्याकडून ५० हजार रुपये जप्त केले आहेत. दोघींना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना २३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.