येत्या ३१ जुलैपर्यत विद्यपीठाचे निकाल जाहीर करण्याची हमी देणारम्य़ा मुंबई विद्यपीठाला उत्तरपत्रिकांचा हिशोबच लागत नसल्यामुळे प्राध्यापकांच्या खात्यावर जमा असलेल्या सर्व उत्तरपत्रिका जमा करण्याचे आदेश बुधवारी विद्यापीठाकडून देण्यात आले आहेत. प्राध्यापकांच्या नावाने त्यांच्या खात्यावर जमा झालेल्या हजारो उत्तरपत्रिका तपासल्या असल्या तरी अजून विद्यपीठापर्यत पोहचलेल्याच नाहीत.  तेव्हा या उत्तरपत्रिका जमा झाल्यानंतरच विद्यपीठाला नेमक्या किती उत्तरपत्रिका तपासल्या आणि किती बाकी आहेत, याचे गणित सुटेल. तेव्हा निकाल जाहीर करण्यासाठी फक्त चार दिवस बाकी राहिले असताना विद्यपीठाची उत्तरपत्रिकाची शोधाशोध सुरु झाली आहे.

ऑनलाइन मूल्यांकन करताना प्रत्येक वेळेस एक उत्तरपत्रिका डाऊनलोड करुन ती तपासणे आणि पुन्हा ती अपलोड करणे, हे वेळखाऊ काम होते. यासाठी  प्राध्यापकांच्या सोईने एकाच वेळी जास्त संख्येने उत्तरपत्रिका त्यांच्या खात्यावर डाऊनलोड करुन घेण्याची सुविधा होती. प्राध्यापकांनी त्यानुसार ३० किंवा ५० च्या संख्येने उत्तरपत्रिका डाऊनलोड केल्या आहेत. या उत्तरपत्रिका तपासल्या तरी त्या पुन्हा अपलोड मात्र त्या-त्या वेळेस केल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे काही विषयांच्या उत्तरपत्रिका या तपासल्या जरी असल्या तरी त्या अद्यप विद्यपीठापर्यत पोहचलेल्याच नाहीत. त्यामुळे नेमक्या किती उत्तरपत्रिका अजून तपासायच्या बाकी आहेत याचा हिशोबच विद्यपीठाला लागणे अवघड झाले आहे. यासाठीच आपल्या खात्यावर जमा असलेल्या उत्तरपत्रिका लवकरात लवकर जमा करण्याचे आदेश विद्यपीठाकडून प्राध्यापकांना देण्यात आले आहेत. तसेच काही प्राध्यापकांनी आपल्या खात्यावर उत्तरपत्रिका जमा केल्या आहेत. परंतु काही कारणाने ते उत्तरपत्रिका तपासू शकत नाहीत. अशा प्राध्यापकांच्या खात्यावरील उत्तरपत्रिका अडकून राहिल्या आहेत. यासाठीच विद्यपीठाने  जे प्राध्यापक वेळेत उत्तरपत्रिका जमा करणार नाहीत त्या उत्तरपत्रिका परस्पर त्यांच्या खात्यामधून काढून घेण्यात येणार आहेत. यापैकी कोणत्या उत्तरपत्रिकांची तपासणी झाली नसेल तर त्य दुसरम्य़ा प्राध्यापकांना तपासणीसाठी देण्यात येणार आहेत. त्यामुळे अमुक एका विषयाच्या उत्तरपत्रिका पूर्णपणे तपासून झाल्या आहेत का या बाबत विद्यपीठही साशंक आहे.

उत्तरपत्रिकांचा हा गोंधळ सावरण्यासाठी आता विद्यपीठाने एकापेक्षा जास्त पेपर खात्यावर डाऊनलोड करण्याची सुविधाच बुधवारपासून काढून टाकली आहे. त्यामुळे आता प्राध्यापकांना एक पेपर डाऊनलोड करुन तो तपासला की अपलोड करावा लागत आहे.

फेरमूल्यांकनाबाबत संभ्रम

नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने पूर्नमूल्यांकन कसे करावे याबाबत कोणतेही मार्गदर्शन विद्यपीठाने केले नसल्याने प्राध्यापकांमध्ये पूर्नमूल्यांकनाच्या पद्धतीबाबत गोंधळ उडालेले आहे. आत्तापर्यतच्या व्यवस्थेमध्ये २५ ते ३५ गुणांमधील दहा टक्के विद्यर्थी, ८० गुणांच्या पुढील दहा टक्के विद्यर्थी आणि यांच्या मधल्या गुण मिळविणारे पाच टक्के विद्यर्थी यांच्या उत्तरपत्रिकांचे पूर्नमूल्यांकन केले जात होते. परंतू आता पूर्नमूल्यांकनासाठी येणारी उत्तरपत्रिकांवर एकूण गुणच नमूद केलेले नसतात. त्यामुळे वरील पैकी कोणत्या गटामध्ये या उत्तरपत्रिकेचे पूर्नमूल्यांकन करायचे आहे, हेच कळत नसल्यामुळे शिक्षकांना सर्व उपप्रश्नांची बेरीज करुन एकूण गुण काढणे. त्यानंतर त्या उत्तरपत्रिकेचे पूर्नमूल्यांकन करणे हे काम वेळखाऊ असल्याचे काही प्राध्यापकांनी व्यक्त केले आहे. तर एकूण गुण न समजताच केलेले मूल्यांकन हे खरम्य़ा अर्थाने पूर्नमूल्यांकन आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्न प्राध्यापकांने तपासून त्याप्रमाणे त्याचे नवीन गुण देण्यात यावेत, असे काही प्राध्यपकांनी सांगितले आहे. त्यामुळे नेमकं पूर्नमूल्यांकन कसे करावे याबाबत संभ्रम असल्यामुळे प्राध्यापक त्यांना समजेल त्याप्रमाणे ही प्रतिकीया पार पाडत आहेत.

उत्तरपत्रिकांचे अपलोडिंग अजूनही सुरुच

विषयाच्या एकूण अपलोडेड उत्तरपत्रिकांच्या संख्येत मागील दोन दिवसांपासून वाढ होत आहे. यामुळे काही विषयांच्या उत्तरपत्रिका अजूनही अपलोड होत असल्याच स्पष्ट होत आहे. यामुळे मात्र काही विषयाच्या प्राध्यापकांना त्यांच्या खात्यावर असा संदेश येतो. मात्र दोन दिवसानंतर काही उत्तरपत्रिका तपासणीसाठी आलेल्या दिसतात. यामुळे विद्यपीठाला एका विषयाच्या परीक्षेला नेमकी किती बसले आणि किती उत्तरपत्रिका उपलब्ध आहेत, हेच माहित नसल्याची शंका अनेक प्राध्यापकांकडून व्यक्त केली जात आहे.