मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील वाणिज्य पदवी (बी.कॉम) सहाव्या सत्रातील परीक्षेचा निकाल शनिवारी रात्री जाहीर केला असून परीक्षेनंतर अवघ्या ३० दिवसांत निकाल जाहीर झाला आहे.

या परीक्षेसाठी ५० हजार ७०८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २३ हजार ६७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ६०.३१ आहे. तृतीय वर्ष वाणिज्य पदवीच्या २ लाख २२ हजार ६३८ उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी होत्या. या उत्तरपत्रिका ३ हजार ७०७ शिक्षकांनी तपासल्या. यातील ५७ हजार १०८ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन करण्यात आले. निकाल विद्यापीठाच्या www.mumresults.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. काही विद्यार्थी आधीच्या सत्रातील परीक्षा अनुत्तीर्ण असल्याने त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.  काही विद्यार्थी जुन्या श्रेयांक प्रणालीतील  आकृतिबंधात प्रथम व द्वितीय वर्ष उत्तीर्ण होऊन नवीन नव्या आकृतिबंधात तृतीय वर्षांची परीक्षा दिली आहे त्यांना समकक्षता देण्याचे काम सुरू असून या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले आहेत, असे परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले.