12 December 2019

News Flash

‘क्यूएस’ क्रमवारीत राज्यातील विद्यापीठे तळातच

देशात मुंबई विद्यापीठ चौदाव्या क्रमांकावर

(संग्रहित छायाचित्र)

देशात मुंबई विद्यापीठ चौदाव्या क्रमांकावर

मुंबई : विद्यापीठांच्या ‘क्यूएस’ जागतिक क्रमवारीनुसार राज्यातील विद्यापीठे तळातच आहेत. राज्यातील मुंबई, पुणे विद्यापीठांचे स्थान हे आठशे ते हजारदरम्यान म्हणजेच अगदी शेवटच्या दोनशे विद्यापीठांमध्ये आहे. या विद्यापीठांच्या देशांतर्गत क्रमवारीनुसार मात्र मुंबई विद्यापीठ देशात चौदाव्या स्थानावर आहे.

‘क्वाकरेली सायमंड्स’ (क्यूएस) ही खासगी संस्था विद्यापीठांची क्रमवारी जाहीर करते. विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर, परदेशी विद्यार्थ्यांची संख्या, संशोधन, गुणवत्ता, नोकरीच्या संधी अशा विविध निकषांच्या आधारे ही क्रमवारी जाहीर केली जाते. यंदा आयआयटी मुंबई देशांत अव्वल ठरले असून जागतिक क्रमवारीत १५२ व्या स्थानावर आहे. यंदाही या क्रमवारीत केंद्रीय विद्यापीठांनीच आपला वरचष्मा राखला आहे. विद्यापीठांच्या या क्रमवारीनुसार राज्य विद्यापीठांचे जागतिक पातळीवरील स्थान खालावल्याचेच दिसत आहे. राज्यातील आघाडीच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे स्थान ८०० ते १००० यादरम्यान आहे. नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या आणि इतर विद्यापीठांना ग्राह्य़ धरण्यात आलेले नाही. या क्रमवारीनुसार राज्य विद्यापीठांच्या देशांतर्गत स्थानाबाबत विचार करता मुंबई विद्यापीठाचे स्थान चौदावे आहे, तर पुणे विद्यापीठाचे स्थान एकोणिसावे आहे. ब्रिक्स देशांतील विद्यापीठांच्या क्रमवारीत मुंबई विद्यापीठाचे स्थान ८९ वे तर आशिया खंडातील देशांतील विद्यापीठांच्या क्रमवारीत हे स्थान १८७ वे आहे.

First Published on June 20, 2019 1:19 am

Web Title: mumbai university rank 14 qs india university rankings 2019
Just Now!
X