व्यक्तीचा मराठी भाषाविकास मोजणे शक्य; लवकरच भाषाविज्ञान विभागाच्या संके तस्थळावर

नमिता धुरी, लोकसत्ता

corruption in academic research
संशोधन कमी आणि बाजार जास्त!
course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Funny Answer Sheets Viral
वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांने सांगितला नवा उपाय; व्हायरल उत्तरपत्रिका वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’

मुंबई : एखाद्या व्यक्तीचा भाषाविकास गणितीय पद्धतीने मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘मेजर्स ऑफ टेक्स्चुअल लेक्सिकल डायव्हर्सिटी’ (एमटीएलडी) या पद्धतीचा वापर लवकरच मराठी भाषेसाठी करता येणार आहे. मुंबई विद्यापीठातील भाषाविज्ञान विभागाच्या प्रियांका डिंगणकर या विद्यार्थिनीने ‘मराठी एमटीएलडी टूल’ विकसित केले आहे. आतापर्यंत रोमन लिपीतील मजकु राचा ‘एमटीएलडी स्कोअर’ मिळू शकत होता; मात्र नव्याने विकसित प्रणालीमुळे देवनागरीतील मराठी मजकु राचा एमटीएलडी स्कोअर काढता येणार आहे.

प्रथम भाषा मराठी शिकणाऱ्या आणि द्वितीय भाषा मराठी शिकणाऱ्या व्यक्तींच्या शब्दसंपदेची तुलना एमटीएलडीमुळे शक्य होईल. विद्यार्थी शाळेत आल्यानंतर त्याचा सुरुवातीचा एमटीएलडी स्कोअर आणि औपचारिक भाषा शिक्षण घेतल्यानंतरचा एमटीएलडी स्क ोअर यांची तुलना करून भाषाशिक्षणाची उपयुक्तता ठरवता येईल. परदेशात स्पेसिफिक लँग्वेज इमरिमेंट, स्किझोफ्रे निया, अफेजिया अशा आजारांचे निदान करताना एमटीएलडी स्क ोअरही लक्षात घेतला जातो, अशी माहिती प्रियांकाने दिली. मजकु रावर एमटीएलडी प्रक्रिया घडण्यापूर्वी प्रत्यय वेगळे काढून मूळ शब्दांमध्ये कसे रूपांतर के ले.  ही प्रणाली भाषाविज्ञान विभागाच्या

संके तस्थळावर उपलब्ध होईल. डॉ. अविनाश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने हे संशोधन केले.

प्रक्रिया अशी..

मजकु रातील प्रत्येक शब्दाचे गुणोत्तर काढले जाते. शब्दप्रकारांची संख्या (नंबर ऑफ टाइप्स) आणि ज्या शब्दाचे गुणोत्तर काढायचे त्या शब्दापर्यंत आलेली एकू ण शब्दसंख्या (नंबर ऑफ टोकन) विचारात घेतली जाते. ‘मला मला पुरणपोळ्या खूप आवडतात’  या वाक्यात पहिल्या स्थानावरील ‘मला’ शब्दाचा नंबर ऑफ टाइप १ आणि नंबर ऑफ टोकन १ आहे. ‘मला’ या शब्दाची पुनरावृत्ती झाल्यास नंबर ऑफ टाइप एकच राहतो. दुसऱ्या स्थानावरील ‘मला’ शब्दाचा नंबर ऑफ टाइप १ आणि नंबर ऑफ टोकन २ आहे. संबंधित वाक्यात  मला, पुरणपोळ्या, खूप, आवडतात असे ४ शब्दप्रकार आहेत. त्यामुळे ‘आवडतात’ या शब्दाचा नंबर ऑफ टाइप ४ आणि नंबर ऑफ टोकन ५ आहे. ‘आवडतात’ शब्दाचे गुणोत्तर आहे ०.८. मजकु रात एखाद्या शब्दाचे गुणोत्तर ०.७२ च्या खाली आल्यावर त्या शब्दापर्यंत आलेल्या सर्व शब्दांचा एक ‘शब्दसंच’ तयार के ला जातो. एकू ण शब्दसंख्येला शब्दसंचांच्या संख्येने भागले जाते. त्यातून जी संख्या मिळते तो पहिला ‘एमटीएलडी स्कोअर’ असतो. संपूर्ण प्रक्रिया मजकु रातील शेवटच्या शब्दापासून पहिल्या शब्दापर्यंत करून दुसरा ‘एमटीएलडी स्कोअर’ मिळवला जातो. दोन्ही स्कोअर्सची सरासरी काढून अंतिम ‘एमटीएलडी स्कोअर’ मिळतो.