News Flash

विरार येथे चेंबरमध्ये सहा वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळला

खेळत असताना उघड्या असलेल्या चेंबरमध्ये मुलगा पडला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

मोशीत गळफास घेऊन महिलेनं जीवनयात्रा संपवली.

विरार येथे आज, शनिवारी चेंबरमध्ये सहा वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. कपिल सिनवेल असे मृत मुलाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, खेळत असताना चेंबरमध्ये पडून त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

विरार पूर्वेकडील फुलपाडा परिसरात आज कपिलेश सिनवेल या सहा वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळला. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. खेळत असताना उघड्या असलेल्या चेंबरमध्ये मुलगा पडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

विरारमधील या दुर्दैवी घटनेनंतर येथील उघड्या चेंबरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील चेंबर उघडे दिसत असूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या स्थानिक प्रशासनाविरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 5:32 pm

Web Title: mumbai virar 6 year old boy found dead in manhole
Next Stories
1 चर्चगेट लोकलमध्ये महिलांची हाणामारी, महिलेचा घेतला चावा
2 मोदींचा नोटाबंदीचा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल- राज ठाकरे
3 झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनच्या दहा केंद्रांवर NIAचे छापे
Just Now!
X