आग्रा रोड व्हॉल्व संकुल ते पोगाव दरम्यानच्या येवई येथील जलशुद्धीकरण यंत्रणेच्या दुरुस्ती कामामुळे २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत मुंबईतील पाणीपुरवठय़ामध्ये १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. याच काळात घाटकोपर उच्चस्तर जलाशयात झडप बदलण्याचे काम करण्यात येणार असून त्यामुळे घाटकोपर आणि कुल्र्यातील काही भागांतील पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहणार आहे.

घाटकोपर उच्चस्तर जलाशयातील कप्पा-१ ला पाणीपुरवठा करणाऱ्या १४०० मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील १४०० मि.मी. व्यासाची झडप बसविण्याचे काम २२ डिसेंबर रोजी हाती घेण्यात येणार असून ते २३ डिसेंबर रोजी सकाळी १० पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. कुर्ला आणि घाटकोपरमधील काही भाग वगळता उर्वरित मुंबईत १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.

घाटकोपरमधील आनंदगड, शंकर मंदिर, राम नगर, हनुमान मंदिर, राहुल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, वर्षांनगर, जय मल्हार नगर, खंडोबा टेकडी, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, निरंकारी सोसायटी, वर्षांनगर टाकी (वर्षांनगर येथील शोषण टाकी व उदंचन केंद्रामार्फत वितरण होणारा संपूर्ण परिसर), डी आणि सी महापालिका वसाहत, रायगड विभाग, गावदेवी पठाण चाळ, अमृतनगर, इंदिरा नगर २, अमीनाबाई चाळ, कातोडी पाडा, भीम नगर, इंदिरा नगर १, अल्ताफ नगर, गेल्डा नगर, जगदुशा नगर, गोळीबार मार्ग, सेवा नगर, ओ.एन.जी.सी. वसाहत, माझगांव डॉक वसाहत, गंगावाडी प्रवेशद्वार क्रमांक २, अंशत: विक्रोळी पार्क साईट परिसर (आनंदगड शोषण टाकी व उदंचन केंद्राद्वारे वितरण परिसर), सिद्धार्थ नगर, साईनाथ नगर आणि पाटीदारवाडी, भटवाडी, बर्वे नगर, काजू टेकडी, न्यू दयासागर व रामजी नगर; तर कुल्र्यातील संघर्ष नगर, खैराणी मार्ग, यादव नगर, जे. एम. एम. मार्ग, लक्ष्मीनारायण मंदिर मार्ग, कुलकर्णी वाडी, सरदारवाडी, डिसूझा कंपाऊंड, अय्यप्पा मंदिर मार्ग, मोहिली पाइपलाइन, लोयलका परिसर, परेरावाडी, इंद्र मार्केट, भानुशाली वाडी, असल्फा गाव, एन.एस.एस. मार्ग, नारायण नगर, साने गुरुजी पंपिंग, हिल नंबर ३, भीम नगर, आंबेडकर नगर, अशोक नगर, हिमालय सोसायटी, वाल्मीकी मार्ग, नुराणी मस्जिद, मुकुंद कंपाऊंड, संजय नगर, समता नगर, गैबण शाह बाबा दर्गा मार्ग येथे पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील.