31 May 2020

News Flash

वांद्रेमधील बेहरामपाडा येथे जलवाहिनी फुटली, दोन मुले वाहून गेली

बेहरामपाडा परिसरातून ७२ इंचाची जलवाहिनी जाते.

बेहरामपाडा परिसरात ७२ इंचाची जलवाहिनी जाते.

मुंबईतील वांद्रेमधील बेहरामपाडा येथे ७२ इंचाची जलवाहिनी फुटल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. यामुळे रेल्वे स्थानकालगतच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याचे वृत्त असून अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.

बेहरामपाडा परिसरातून ७२ इंचाची जलवाहिनी जाते. शुक्रवारी दुपारी ही जलवाहिनी फुटल्याने परिसरात गोंधळ निर्माण झाला. जलवाहिनीतील पाणी बेहरामपाड्यातील झोपड्यांमध्ये शिरल्याने परिस्थिती बिकट झाली. त्यामुळे पावसाने विश्रांती घेतली असली तरी हा परिसर जलमय झाला होता. जलवाहिनी फुटल्याचे वृत्त समजताच महापालिका आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी सुरु झाले. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
जलवाहिनी फुटल्याने दोन लहान मुलेही पाण्यात वाहून गेल्याचे वृत्त आहे. दोन्ही लहान मुलांचा शोध सुरु असल्याचे प्रसारमाध्यमांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2017 1:02 pm

Web Title: mumbai water pipeline bursts in behrampada of bandra east fire brigade at spot
Next Stories
1 सदनिकाधारकांना करदिलासा
2 ऑगस्टपासून राणीच्या बागेतील प्रवेश महाग
3 विद्यापीठाने १११ कोटींच्या ठेवी निधीसाठी मोडल्या
Just Now!
X