मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेने अंधेरी स्थानकातील आठ आणि नऊ क्रमांकांच्या प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी दोन्ही प्लॅटफॉर्मवरून सुटणाऱ्या लोकल गाड्यांच्या वेळांमध्ये बदल केला आहे. उद्यापासून म्हणजे २५ जूनपासून गाड्या बदललेल्या वेळेनुसार धावतील.

सोमवारपासून वसईतून अंधेरीसाठी सुटणारी स. ७.४३ची लोकल स. ७.४० वाजता सुटेल. ही लोकल ८.२८ ऐवजी स. ८.२१ वाजता अंधेरीला पोहोचेल. वसई ते अंधेरी ही लोकल स. ७.४३ ऐवजी स. ७.४० वाजता सुटेल. ही लोकल अंधेरी येथे स. ८.२८ ऐवजी स. ८.२१ वा. पोहोचेल. अंधेरी ते विरार ही लोकल स. ८.३५ ऐवजी स. ८.२७ वाजता सुटून विरारला स. ९.२२ ऐवजी स. ९.३१ वाजता पोहोचेल. चर्चगेट ते अंधेरी ही लोकल स. ८ ऐवजी स. ८.०४ वाजता सुटून स. ९.२२ ऐवजी ९.३२ वाजता पोहोचेल.

आजचा मेगाब्लॉक –
पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत देखभाल-दुरुस्तीच्या विविध कामांसाठी अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असेल. या काळात बोरीवली ते गोरेगाव दरम्यान धिम्या मार्गावर धावणाऱ्या लोकल जलद मार्गावरून धावतील. मेगाब्लॉक दरम्यान बोरीवली स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १, २, ३ आणि ४ वरून एकही लोकल धावणार नसल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.