09 March 2021

News Flash

उत्तर भारतीयांनी कामबंद केलं तरी मुंबई ठप्प होणार नाही – रामदास आठवले

उत्तर भारतीय लोकच मुंबई चालवतात. उत्तर भारतीयांनी काम बंद केल्यास मुंबई ठप्प होईल, असं वादग्रस्त विधान मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलं आहे

रामदास आठवले

उत्तर भारतीयांनी कामबंद केल्याने मुंबई ठप्प होणार नाही असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. काँग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केलं. उत्तर भारतीय लोकच मुंबई चालवतात. उत्तर भारतीयांनी काम बंद केल्यास मुंबई ठप्प होईल, असं वादग्रस्त विधान मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलं आहे. नागपूर येथे उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेत बोलताना निरुपम यांनी हे विधान केलं असून त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

‘संजय निरुपम यांनी उगाच मराठी भाषिक आणि उत्तर भारतीयांमध्ये वाद निर्माण करु नये. याचा काँग्रेसला कोणताही फायदा होणार नाही आहे. याउलट त्यांना मराठी भाषिकांच्या नाराजीला सामोरं जावं लागू शकतं’, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘मुंबईसाठी उत्तर भारतीयांचं योगदान मोठं आहे. मात्र त्यांनी कामबंद केल्याने मुंबई ठप्प होईल हे मान्य नाही’.

काय म्हणाले होते संजय निरुपम ?
उत्तर भारतीय माणूसच मुंबई-महाराष्ट्र चालवतो. दूध विकण्यापासून टॅक्सी चालवण्यासारखी सर्व कामं उत्तर भारतीय माणूस करतो. तुम्ही कोणतंही क्षेत्र सांगा. त्यामध्ये उत्तर भारतीय सक्रीय आहेत. उत्तर भारतीय माणूस रिक्षा-टॅक्सी चालवतो. फळं-भाजी विकतो. बांधकाम क्षेत्रातील बहुतांश मजूर हे उत्तर भारतीय आहेत. सर्व क्षेत्रांमध्ये उत्तर भारतीयांचं प्रमाण लक्षणीय आहे. हीच माणसं संपूर्ण मुंबई चालवतात. त्यांना काम बंद करायला भाग पाडू नका. जर एक दिवस उत्तर भारतीयांनी ठरवलं, तर मुंबईकारांना जेवायला मिळणार नाही. त्यांनी ठरवलं तर मुंबई- महाराष्ट्र ठप्प होऊ शकतो, पण तसं करण्यास आम्हाला भाग पाडू नका असा अप्रत्यक्ष इशारादेखील निरुपम यांनी दिला.

उत्तर भारतीय लोक क्षेत्रीय मानसिकतेचे नाही तर राष्ट्रीय मानसिकतेचे असतात. गुजरातमध्येही उत्तर भारतीयांवर हल्ले होत आहे. आज पंतप्रधानांच्या गुजरातमध्ये उत्तर भारतीयांना मारले जात आहे. एक दिवस मोदींनाही वाराणसीला जायचे आहे, असंही निरूपम पुढे म्हणाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2018 2:08 pm

Web Title: mumbai will be not shut if north indians stops working says ramdas athavle
Next Stories
1 ‘ओम’च्या जपामुळे भांडण; फॅशन डिझायनरचा मृत्यू, मुलाला अटक
2 उदयनराजे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात येत असतील तर त्यांचे स्वागतच!- नितेश राणे
3 मुंबई – गृहपाठ न केल्याने शिक्षकाने मारली कानाखाली, विद्यार्थिनीची आत्महत्या
Just Now!
X