24 November 2020

News Flash

प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कवर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

महिला आणि तिच्या दोन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले

प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क येथे संचलन सुरु असताना आत्मदहनाच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. महिलेच्या पतीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. महिला तिच्या दोन मुलांसह शिवाजी पार्कमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

शिवाजी पार्कमध्ये शुक्रवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलन पार पडले. राज्यपाल सी. विद्यासागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर संचलनाला सुरुवात झाली. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार संचलन सुरु असताना एक महिला तिच्या दोन मुलांसह शिवाजी पार्कमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होती. सतर्क पोलिसांनी तातडीने तिला रोखले आणि चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत महिला आत्मदहन करणार होती, अशी माहिती समोर आली. महिलेच्या पतीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. मात्र, या प्रकरणात कारवाई न झाल्याने महिला नाराज होती. म्हणूनच तिने प्रजासत्ताक दिनीच आत्मदहनाचा करण्याचा प्रयत्न केला. मुंबई पोलिसांकडून या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही. महिलेचे नाव काय, ती नेमकी कुठून आली होती, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2018 12:47 pm

Web Title: mumbai woman detained with her two sons while trying to enter republic day parade venue in shivaji park
Next Stories
1 म्हाडाच्या घरांतील घुसखोरांवर नजर!
2 ‘प्रवासी’सत्ताक दिन!
3 नशेसाठी औषधांचा वाढता वापर उघड
Just Now!
X